आमदार गिरीश महाजनांसह तिघांचे अर्ज वैध, जिल्ह्यातील लक्षवेधी लढत.(घोडेबाजारात तेजी येण्याची शक्यता.)

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१०/२०२१
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जामनेर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून आमदार गिरीश महाजनांसह ३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.आमदार गिरीश महाजन, नाना पाटील, अलकाताई पाटील अशी या अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे आहेत.
जिल्ह्यातील लक्षवेधी लढतींपैकी ही एक लढत आहे. आता अन्य दोन उमेदवार माघार घेऊन आमदार गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा करतील का ? , याची तालुक्यात उत्सुकता लागली असून आमदार गिरीश महाजन याच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याने आमदार गिरीश महाजन यांचा बिनविरोध होण्यासाठीचा मार्ग मोकळा न झाल्यास ते विजय मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतील म्हणून निवडणूकीच्या घोडेबाजारात तेजी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कारण भाजपच्या दृष्टिने ही लढत प्रतिष्ठेची असल्याने जिल्हा बँकेची निवडणूक आता रंगतदार होणार हे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील राजकीय घडामोडींच्या पार्शवभूमीवरही या लढतीकडे पहिले जात आहे. अन्य दोघांपैकी एकानेही अर्ज कायम ठेवला तरी आमदार गिरीश महाजन यांना त्यांचा मुकाबला करावा लागणार आहे.
भाजपकडून या निवडणुकीच्या सगळ्या रणनीतीची नेतृत्वच आमदार गिरीश महाजन हे करत असल्याने त्यांना त्यांच्याच या मतदारसंघात बेजार करण्याचे डावपेच त्यांचे विरोधक आखू शकतात असे झाले, तर जिल्ह्यातील भाजपच्या सगळ्या उमेदवारांसाठी करावी लागणारी धावपळ आणि डावपेचांनी आखणी आमदार गिरीश महाजन कसे करतील हा आता जाणकारांच्याही उत्सुकतेचा मुद्दा ठरला असून या निवडणुकीत भाजप सगळेच पर्याय वापरून विययी होण्यासाठी प्रयत्नशील राहाणार असल्याने घोडेबाजारात तेजी येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.