रेल्वेस्टेशन परीसरात मरनावस्थेत पडलेल्या ५५ वर्षीय बेवारस व्यक्तीचे माणुसकी समुहाने वाचवले प्राण.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०२/२०२२
*उपचारासाठी केले रात्री उशिरापर्यंत शासकीय रुग्णालयात दाखल*
औरंगाबाद रेल्वेस्टेशन परिसरातील मुख्य गेटच्या बाजुला शनी मंदिराजवळ एक अनोळखी व्यक्ती गेल्या ३ दिवसापासून मरनावस्थेत आजारी पडला असून त्यास बोलता व उठताही येत नाही म्हणून
त्यास उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आवश्यक आहे अशी माहिती रेल्वेचे संतोषकुमार सोमाणी यांनी फोनद्वारे समाजसेवक सुमित पंडित यांना रात्री उशिरा कळवीली. सुमित यांनी क्षणाचाही विलंब न करता माणुसकी समुहाच्या मदतीने रेल्वे स्टेशन येथे जावुन त्याची विचारपूस केली.
प्रत्यक्ष पाहिले असता संबंधित व्यक्तीला बोलताही येत नव्हते तसेच शारीरिक हालचाली व संवेदना जाणवत नव्हत्या म्हणून नियमानुसार सदरील व्यक्तीची माहिती वेदांतनगर पोलीस निरीक्षक मा.श्री. सचीन सानप यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने त्याला घाटि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मेडिकल विभागातील डॉक्टरांनी त्याची परिस्थिती गंभीर असल्याने क्षणाचाही विलंब न करता उपचार चालु केले. नंतर एम. आर. आय. व वैद्यकीय तपासण्या करुन रात्री उशिरापर्यंत वार्डात दाखल करण्यात आले.
माणुसकी समुहाच्या मदतीने त्यास जीवदान मीळाले आहे.या मदतकार्यात पोलीस निरिक्षक मा.श्री. सचीन सानप वेदांतनगर, मा.श्री. संतोषकुमार सोमानी रेल्वे सेना, समाजसेवक मा.श्री. सुमित पंडित, बोधी संस्थेचे डॉ. मा.श्री. रंजना प्रशात दंदे, मा.श्री.अजय वाघमारे,डॉ अतुल मुरुगकरी,चंदन राजपुत,घाटि रुग्णलयातील डॉक्टर यांच्या मदत मिळाल्याने त्याला जीवदान मिळाले आहे.
माणुसकी नेमकी का संपत चालली ? याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे ३ दिवसापासून मरनावस्थेत पडलेला हा बेवारस पेशंट,
तो मरनावस्थेत ३ दिवसापासून रेल्वेस्टेशनच्या मुख्य प्रवेशव्दाराच्या बाजुला पडलेला होता. असे लोक लांब ऊभे राहून सांगत होते. तेथुन ३ दिवसात हजारो लोकांनी ये-जा केली परंतु त्या मरनावस्थेत पडलेल्या बेवारसाकडे कोन्हाचेच लक्ष गेले नसेल का ? त्याला कोणीही बघले नसेल का ? परंतु माणूस हा माणूस म्हणून जगात नसून माणूसपण विसरला आहे. असे या घटनेतून जाणवते.
आपण सगळेच क्षणिक सुखाच्या मोहमायेत अडकत आहोत. व यातच आपण स्वताला संपवत आहोत. हे मात्र निश्चित आहे. संबंधित अनोळखी व्यक्ती भयावह अवस्थेत पडलेला असतांना त्यांच्या जवळ कोणीही जाण्याची हिंमत किंवा माणूसकी दाखवली नाही. आजकाल एक दृश्य बघायला मिळते ते म्हणजे कुठे काही घटना घडल्यास मदत करण्याऐवजी फोटो काढून ते सोशल मीडियावर वायरल करण्यासाठी जणू चढाओढ लागलेली असते. परंतु फक्त फोटो काढुन समाधन मीळत नसते. खरंतर प्रत्यक्ष संबंधितांच्या दुखासुखात धावून जात अशा पीडित व गरजूंची सेवा केली पाहिजे. तरच या भूतलावर मनुष्यजन्ममात आलेल्या माणसाचे जीवन सार्थक होईल अन्यथा आपल्यापेक्षा जनावरे बरी असेच म्हणावे लागेल.
कारण मी माझ्या आयुष्यात एक प्रसंग पाहिला होता एका रस्त्यावर भरधाव वेगाने एका वाहनाने एका माकडाला उडवले होते ते माकड जखमी होऊन रस्त्यावर विव्हळत असतांनाच त्याच्यासोबत असलेल्या शेकडो माकडांनी त्याच्याभोवती गराडा टाकून मोठ्या आवाजात आक्रोश करत मदतीची मागणी करत होते. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रत्यक्ष आरडाओरड करून मदत मागत होते. हे दृश्य पाहून हे दृश्य पाहून माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाच्या काळजाला पाझर फुटेल अशी केविलवाणी परिस्थिती त्या माकडाची होती.
एकीकडे जनावर इतकी संवेदनशीलता असल्यावर दुसरीकडे माणूस मात्र संवेदनशून्य होत चालला आहे ही मोठी खेदाची बाब आहे. म्हणून मला संतांचे एक वाक्य आठवले व त्या वाक्याचा सारासार विचार व अर्थ समजून घेतल्यास “जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो तोची साधु ओळखावा देव तेथीशी जानावा. म्हणजे तुम्ही सत्कर्म करत रहा असे केल्यास तुम्हाला कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज भासणार नाही. असेच संदेश आपल्या संत महंत यांनी दिले आहेत. म्हणून प्रत्येकाने माणूस म्हणून जन्माला येणे सोपे आहे पण माणूस म्हणून जगणे आणि वागणे हे जेव्हा समजून येईल तेव्हा या भूतलावर कोणीही पीडित अशा अवस्थेत दिसून येणार नाही हे मात्र निश्चित.
———समाजसेवक सुमित पंडित