शेंदुर्णी येथील श्री. छत्रपती तायकांदो क्लासच्या विद्यार्थ्यांना १० पैकी १० मेडल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०९/२०२२
पाचोरा येथे झालेल्या युथ गेम्स कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व जळगाव जिल्हा युवा खेल परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत शेंदुर्णी येथील श्री. छत्रपती स्पोर्टस क्लबच्या दहा विद्यार्थ्यांनी पदक मिळवून घवघवीत यश संपादन केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नुकत्याच पाचोरा येथे पार पडलेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात उमेश तडवी, गरिमा लोखंडे, राधिका गवळी यांनी सुवर्णपदक मिळविले तर दक्ष लोखंडे, तनिष्का सुळ, रागिनी पाटील, प्रद्युम्न जगताप, सोहम सूर्यवंशी यांनी रजत पदक व सिद्धेश सोनवणे आणि कार्तिकी चौधरी यांनी कास्यपदक मिळविले.सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची औरंगाबाद येथे १८ व १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून या खेळाडूंना तायक्वांदो प्रशिक्षक श्रीकृष्ण चौधरी सर व महिला प्रशिक्षक लोचना चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष श्री प्रफुल्ल पाटील, युथ गेम्स कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे जळगाव जिल्हा सचिव सुनील मोरे सर, जळगाव जिल्हा तायक्वांदो असो.चे सचिव अजित घारगे तालुका सचिव हरिभाऊ राऊत,शेंदुर्णी नगराध्यक्ष विजयाताई खलसे, उपनगराध्यक्ष निलेश थोरात, दिनेश विसपुते,सुनील गुजर, रोशन जैन, अशोकभाऊ बारी,डॉ.पंकज गुजर, तडवी सर आदींनी अभिनंदन केले आहे.