सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • शेंदुर्णी येथील संशयास्पद व्यवहारावरुन दि पाचोरा पीपल्स बॅंक निवडणुकीत सहकार पॅनल अडचणीत.

  • कुऱ्हाड खुर्द येथील हॉटेल तारांगणाचा धिंगाणा थांबला, परंतु हॉटेल मैत्रीचे काय ?

  • पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा पोलीस अधीक्षकांनी केला गौरव.

  • वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणीने भावाला दिली गाय भेट.

  • लोहारी बुद्रुक सरपंच व सरपंच पती यांच्या विरोधात महिला उपसरपंचांची तक्रार, चौकशी करुन कारवाईची केली मागणी.

शैक्षणिक
Home›शैक्षणिक›इंटरनॅशनल पोस्टर चित्रकला स्पर्धेत पाचोऱ्याचे नाव झळकले.

इंटरनॅशनल पोस्टर चित्रकला स्पर्धेत पाचोऱ्याचे नाव झळकले.

By Satyajeet News
February 27, 2022
467
0
Share:
Post Views: 122
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०२/२०२२

गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगांव आयोजित, इंटरनॅशनल पोस्टर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जवळपास १२०० ते १४०० कला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत क्रीएटीव्ह गांधी, कोरोनासे क्या सीख पाए, ग्रीन अर्थ या ३ विषयावर चित्र साकारायची होती. या स्पर्धेत भारतातुनच नव्हे तर इतर देशातूनही या स्पर्धेसाठी चित्र आली होती.

या स्पर्धेत पाचोरावासीयांसाठी अभिमानाची गोष्ट ठरली ती म्हणजेच पाचोऱ्यातील रंगश्री आर्ट फाऊंडेशनचा विद्यार्थी अक्षय श्रीराम पाटील याला प्रथम १५०००/- पारितोषिक व अजय पांडुरंग विसपुते यास द्वितीय ७५००/- पारितोषिक मिळाले. इंटरनॅशनल स्पर्धेत रंगश्रीचे यश हे पहिल्यांदाच मिळाले त्यांना सुबोध कांतायन सरांचे मार्गदर्शन मिळाले.

*उल्लेखनीय बाब यातील आदरणीय परीक्षक*
श्रीमान जी उदय पारकर (आंतरराष्ट्रीय ऍड मॅन तथा स्पेस डिझायनर), श्रीमान वासुदेव कामत (आंतरराष्ट्रीय चित्रकार), या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या परीक्षकांनी महाराष्ट्रातील, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्याच्या विद्यार्थ्यांच्या चित्रांना दिलेला हा न्याय असून पाचोरावासीयांसाठी हा खूप मोठा सन्मान आहे.

अक्षयने केलेल्या चित्रात परीक्षकांना सिम्प्लिसिटी दिसून आली. त्याने दगडाची रचना करून त्यावर एक पीस लावून त्यातून गांधीजींची प्रतिमा निर्माण केली. अन त्यावरील घोषवाक्य “स्वतंत्रता की ओर कठीणाईयोपर चला. एक दूत शांती का” हे पण चित्राला खूप समर्पक होते. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पेस डिझाइनर उदय पारकर यांनी अक्षयच्या चित्राबद्दल असे म्हटले की “ये तो मैने भी कभी सोचा भी नही, ये बच्चा आगे जा कर बडा डिझायनर बनेगा” तर दुसऱ्या चित्रात अजयने महाराष्ट्राच्या कलेचा म्हणजेच वारली कलेचा वापर केला. यानेही वारलीतुन गांधीजींच्या जीवनावर आधारित चित्र रेखाटली. त्यात एक तपस्वी हा तप करतांना दिसत आहे. तर तो तपस्वी ,साधक हा गांधीजींचे प्रतिकात्मक रुपात स्वातंत्रतेची साधना करतांना चित्रात दाखविला आहे.

परीक्षकांनी अक्षय व अजयच्या केलेल्या रचनेचे खूपच कौतुक केले.
रंगश्री तुन असेच कलावंत उदयास येतात की जे आपल्या तालुक्याचे, जिल्ह्याचे, राष्ट्राचे, अन देशाचे नाव उज्वल करतात. इंटरनॅशनल स्पर्धेत पाचोऱ्याचे नाव येणे तेही एक नंबर नव्हे तर दुसऱ्या नंबर साठी ही नाव उच्चारने हे आपल्या साठी खूप गौरवास्पद आहे.
त्यांच्या या यशाबद्दल रंगश्रीच्या अध्यक्षा श्रीमती मंजुळा मुरलीधर सोनार, सुबोध कांतायन भारती कांतायन, अजय पाटील, विशाल सोनवणे, वैभव शिंपी, आकाश सावंत, तन्मय पाटील यांनी सत्कार करून त्यांचे कौतुक केले. पाचोरा परिसरातील सर्व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

विद्युत वितरण कंपनीची मनमानी, बळीराजाच्या डोळ्यात पाणी. ...

Next Article

सत्यजित न्यूजच्या बातमीचा इफेक्ट, अंबाडी शिवारातील शेतकऱ्यांना ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • शैक्षणिक

    दिव्यांग सप्ताह निमित्त तालुकास्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतला मनमुराद आनंद.

    December 11, 2022
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी फसव्या वैद्यकीय बिलिंग पध्दतीने लाटला लाखोंचा मलिदा निलेश उभाळे यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची ...

    April 20, 2024
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    गरुड महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचा अभ्यास दौरा यशस्वी.

    September 28, 2022
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    श्री. गो. से. हायस्कूलमध्ये “वार्षिक स्नेहसंमेलना निमित्ताने २ व ३ जानेवारी रोजी भरगच्च कार्यक्रम.

    December 31, 2022
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    कु. शुश्रुता पाटील हिची वैद्यकीय प्रवेश परीक्षेत गुणवत्ता सिद्ध.

    June 11, 2024
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    शाळेच्या संचालक मंडळाची मनमानी, पालकाच्या डोळ्यात पाणी. शाळेची फी भरली नसल्याने विद्यार्थिनी वार्षिक परीक्षेपासून वंचित.

    April 7, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या विजयाने पाचोर्‍यात भाजपाचा जल्लोष.

  • प्रासंगिक

    हयातीतच वारस लागले उताऱ्यावर, आजीबाईंना सोडल उकिरड्यावर.

  • Uncategorized

    सुटीवर आलेल्या जवानाचा मृतदेह विहिरीत आढळला; परिसरात खळबळ.

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज