एस. एस. एम. एम. महाविद्यालय येथे नेहरू युवा केंद्र जळगावं व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने गहन स्वयंसेवक नोंदणी कार्यक्रम(IVEP) आणि CLEAN INDIA 2.0 अभियान कार्यक्रमाचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/१०/२०२२
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव, व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त गहन स्वयंसेवक नोंदणी कार्यक्रम आणि clean India 2.0 अभियान राबवण्यात आले.
सदरील कार्यक्रम नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर व लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा तालुका समन्वयक मनोज पाटील यांनी एस. एस. एम. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील सर यांच्या परवानगीने राबविण्यात आले.
ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉ. जे. डी. गोपाळ हे होते. राष्ट्रीय युवा स्वयंसेवक मनोज पाटील व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. बी वळवी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी १२० हून अधिक रासेयो स्वयंसेवक हजर होते. या कार्यक्रमात तालुका समन्वयक मनोज पाटील यांनी नेहरू युवा केंद्र आयोजित कार्यक्रमांची माहिती सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ सर यांनी राष्ट्र निर्मिती मध्ये युवकांचे योगदान रोजगार निर्मित या विषयी माहिती दिली.यावेळी प्रा डॉ के एस इंगळे प्रा अधिकराव पाटील प्रा. डॉ. प्राजक्ता शितोळे प्रा. सुवर्णा पाटील प्रा. इंदिरा लोखंडे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. बी. वळवी यांचे अनमोल सहकार्य लाभले प्रा नितीन पाटील यांनी आभार मानले. यानंतर महाविद्यालयात स्वच्छ्ता मोहीम राबिण्यात आली.महाविद्यालयीन परीसर स्वच्छ करण्यात आला आणि स्वच्छ भारत अभियान 2.0 या विषयी माहिती देण्यात आली. अश्या प्रकारे मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.