अनाथांची माय कै.सिंधुताई सपकाळ यांना, अंबे वडगाव येथे भावपूर्ण श्रद्धांजली.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०१/२०२२
अनेक अनाथांना मायेची ऊब देणाऱ्या कै. सिंधुताई सपकाळ यांचं नुकतच निधन झाल्याने महाराष्ट्र पोरका झाला आहे. कै. सिंधुताईंचा आणि अंबे वडगावचा ऋणानुबंध हा जुनाच आहे. कै.सिंधुताई सपकाळ या आठ ते दहा दिवस अंबे वडगाव येथील मंन्साराम पाटील व दिलीप जैन यांच्याकडे वास्तव्याला होत्या त्यावेळी त्यांची परिस्थिती अंत्यत बिकट होती. तसेच त्या महानुभव पंथाच्या अनुयायी असल्याने त्या प.पू.प.महंत श्री. मोठेबाबा यळमकर यांच्याही सहवासात होत्या.
अश्या या कै. सिंधुताई सपकाळ या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जातात. म्हणून त्यांना २०२१ मध्ये सामाजिक कार्य श्रेणीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अशा या अनाथांची माय कै. सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अंबे वडगाव येथे ग्रामस्थांतर्फे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कै.सिंधुताईच्या प्रतीमेस माल्यार्पण करून सामुहीक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सुरवातीला कायदेतज्ज्ञ श्री.मंगेशराव गायकवाड, श्री.संतोष पाटील, श्री. हर्षल पाटील, श्री.सुनील निकम, श्री.मंगेशराव खैरनार, श्री. पितांबर सपकाळे, डॉ. श्री. शामकांत पाटील श्री. मिलिंद भुसारे, श्री. मुकेश पाटील, श्री. समाधान पवार, श्री. रामेश्वर पवार, श्री. वाल्मिक देवरे, श्री. राजेंद्र देवरे, श्री. मधुकर मराठे, श्री. साहेबराव शळके,श्री. संदिप मराठे, महेश गायकवाड, श्री. देवीदास पाटील, श्री.आण्णा भुसारे, श्री. कीसन देवरे, श्री. अशोक शळके, श्री. या ग्रामस्थांनी कै.सिंधूताई सपकाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाब पुष्प अर्पण केले. नंतर असंख्य ग्रामस्थांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.