पिंपळगाव हरेश्वर येथे उष:काल पॉलिक्लिनिक व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे उष:काल पॉलिक्लिनिक व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपाचे तालुका युवा सरचिटणीस मा.श्री. परेश अशोक पाटील भाजपाचे शहराध्यक्ष मा.श्री. विनोदभाऊ महाजन तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा.श्री. मौजुलाल राजूलाल जैन यांच्या शुभहस्ते करण्यात आले या रक्तदान शिबिरात चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.
या रक्तदान शिबिरात डॉ. शांतीलाल तेली, वैभव काटे, रवींद्र हटकर, हर्षल भोई, चेतन व्यवहारे, अजय दशेर, तुषार मालकर, निलेश मालकर, वैभव देव, ज्ञानेश्वर लोहार, भारत वाघे, भरत हटकर, नरेंद्र ठाकूर, अक्षय जाधव, गणेश हटकर, अजय करवंदे, अरुण बुद्धा, राहुल देव, मनोज जाधव, प्रेमराज कुडके, कृष्णा तेली, विजय काळे, भूषण बडगुजर, खूबचंद जाधव, वेद जतमल, डॉ. कल्पेश तेली, विश्वनाथ बडगुजर, वसंत गिते, तालीम शेख, विजय शिरसागर, गणेश जाधव, भारत चव्हाण, देवेंद्र देव, शशिकांत बोरसे, अंकुश तेली, कमलेश नैनाव, ऋषिकेश गीते, विजय पाटील, राहुल पवार, यांनी रक्तदान केले.