गिरणा पंपिंग रस्त्यावर पत्रकार भुवनेश दुसाने यांच्या गाडीला अपघात, कामाच्या चौकशीची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०९/२०२२
पाचोरा येथील साई पार्क परिसरातील रहिवासी पत्रकार भुवनेश दुसाने हे वरखेडी येथील त्यांच्या मालकीच्या गण साई समर्थ पेट्रोल पंपाचे काम आटोपून घराकडे जात असतांना गोकुळ धाम जवळच असलेल्या गिरणा पंपिंग परिसरातील नवीन रस्त्यावरुन जात असतांनाच जोड रस्त्यावर वळण घेतांना वळण रस्त्याच्या ठिकाणी कॉंक्रिटीकरण व साइड पट्ट्यांचे काम अपूर्ण असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या अंदाजे साडेतीन खोल फूट खड्ड्यात ते गाडीसह जाऊन पडले नशिबाने गाडी न उलठता जागेवर थांबल्यामुळे पुढील अनर्थ टळला भुवनेश दुसाने खिडकीतून सुखरूप बाहेर निघाले.
हा अपघात झाल्यानंतर गोकुळ धाम, साई पार्क व परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी तेथील रहिवाशांनी संतप्त प्रतिक्रिया देत गोकुळ धाम ते साई पार्क पर्यंत झालेला रस्ता जमिनीपासून अंदाजे चार फूट उंच झाला असून या रस्त्याचे दोघे बाजूला खोलगट भाग तयार झाला आहे. वास्तविक पाहता रस्त्याचे सोबतच रस्त्याच्या बाजूला काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या बरोबरीने साईड पट्ट्या बनवणे अत्यंत गरजेचे व नियमात बंधनकारक असल्यावरही संबंधित ठेकेदाराने या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष केले आहे असे सुज्ञ नागरिकांनी बोलून दाखवले तसेच साईड पट्टी खोल झाल्यामुळे या रस्त्यावरून जाता येतांना आजपर्यंत स्वयंचलित दुचाकी व सायकलींचे बरेच अपघात झाले असून लहान मुलांना खेळतानाही इजा झाली आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता जानकारांच्या मते साई पार्क ते गिरणा पंपिंग रस्त्याचे काम ठरवून दिलेल्या इस्टिमेटनुसार होत नसून रस्त्याच्या रुंदी बाबत शंका उपस्थित केली आहे. तसेच जोड रस्ता व वळणाच्या रस्त्यावर रास्ता जोडीच्या भागात कॉर्नरवर काँक्रिटीकरण केले नसल्याने या वळणाच्या रस्त्यावर गाडी वाढवणे मुश्किल होत आहे. तर काही भागात रस्त्याचा नकाशा बदलवून काँक्रिटीकरण केले जात असून नको तिथे गतिरोधक बसविण्यात आल्याचाही आरोप या परिसरातील रहिवाशांनी केला आहे. विशेष म्हणजे या शहराबाहेरील वस्तीत पथदिवे नसल्याने रात्रभर अंधार असतो या अंधारात चोरट्यांची भिती वाढली असून याच अंधारात येथील रहिवाशांना आपले दैनंदिन कामकाज पूर्ण करावे लागत आहे. म्हणून संबंधित रस्त्याची चौकशी होऊन योग्य ठिकाणी काँक्रिटीकरण व रस्त्याचे बाजूला साईड पट्टी चे काम त्वरित करून द्यावे अशी मागणी या परिसरातील रहिवाशांनी केली आहे.