महात्मा गांधी वाचनालयाजवळ असलेल्या मुतारी समोरील जीवघेणा खड्डा त्वरित दुरुस्त करावा वृध्द व दिव्यांग बांधवांची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०५/२०२३
पाचोरा शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महात्मा गांधी वाचनालयाच्या भिंतीजवळ एक सार्वजनिक मुतारी बांधण्यात आलेली आहे. याच चौकापासून काही अंतरावर प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, नगरपरिषदेचा दवाखाना, खरेदी, विक्री कार्यालय, पुरवठा विभागाचे कार्यलय अशी विविध कार्यालये असल्याकारणाने तालुक्यातील जनता आपल्या कामानिमित्ताने पाचोरा शहरात येत असल्याने या चौकात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
बाहेरगावाहून आलेले किंवा खेड्यातील लोक तसेच स्थानिक व्यवसायिक आपले दैनंदिन कामकाज करत असतांना नैसर्गिक विधीसाठी म्हणजेच लघवी करण्यासाठी याच चौकातील महात्मा गांधी वाचनालयाच्या भिंतीजवळ एकमेव मुतारी असल्याने या मुतारीचा वापर करतात. परंतु या मुतारीजवळ भलामोठा खड्डा असल्याने दिव्यांग, जेष्ठ, श्रेष्ठ, वृध्द व्यक्तींना लघुशंकेसाठी जातांना तारेवरची कसरत करावी लागते तसेच कुणाचातरी आधार घेऊन वेळ काढून न्यावी लागत आहे. तसेच मुतारीत जातांना व येतांना आजपर्यंत बरेचसे वयोवृद्ध इसम पडून त्यांना मार लागला आहे.
हि परिस्थिती पाहता पाचोरा नगरपरिषदेकडून या मुतारीजवळ असलेला भलामोठा खड्डा भरुन त्याठिकाणी पायऱ्या बनवण्यात याव्यात किंवा रस्त्याच्या बरोबरीने सपाटीकरण करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.