कुर्हाड खुर्द येथे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुख्मिणी मंदिरावर भाविकांची मांदियाळी.

सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~१०/०७/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथे इतिहास कालीन शेकडो वर्षांपूर्वीचे असलेले पुरातन व श्रध्दास्थान म्हणून ओळखले जाणारे जागृत देवस्थान विठ्ठल, रुख्मिणी मंदिर आहे. या मंदिरात सालाबादप्रमाणे यात्रोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने आजही देवयानी आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर कुऱ्हाड गावातील तसेच जळगाव जिल्ह्यातील भाविक, भक्त या विठ्ठल, रुख्मिणी मंदिरात येऊन मनोभावे पूजा करुन आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी तसेच दर्शन घेऊन आशिर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात.
आज दिनांक १० जूलै रविवार रोजी देवयानी आषाढी एकादशीच्या निमित्ताने हजारो भाविकांनी कुऱ्हाड येथील विठ्ठल, रुख्मिणी मंदिरात हजेरी लाऊन दर्शनाचा लाभ घेतला. तसेच गावातील सांप्रदायिक भजनी मंडळातर्फे दुपारी एक वाजेपर्यंत भजन, भारुड व भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या यात्रेत आलेल्या भाविकांसाठी मा. श्री. भास्कर चिंधू मिस्तरी यांनी मोफत फराळाची व्यवस्था केली होती. हजारो यात्रेकरुंनी फराळाचा लाभ घेतला.
सद्यस्थितीत या पुरातन मंदिरांच्या जिर्णोधाराचे काम हाती घेतले आहे. हे काम आजपर्यंत पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत झाले असून पूर्ण काम करण्यासाठी प्रयत्न सुरु असून भाविक, भक्तांनी आपापल्या परीने व श्रध्देने मंदिर बांधकामासाठी सढळ हाताने आर्थिक मदत करावी असे आवाहन कुऱ्हाड गावचे प्रथम नागरिक सरपंच कैलास भगत, विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वर तेली, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण भाऊ पाटील, गणेश शिंदे, भास्कर मिस्त्री यांनी केले आहे.