श्रीराम नगर येथे होत असलेल्या बालोद्यानास क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव द्यावे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०१/२०२२
पाचोरा येथील सिंधी कॉलनी जवळील श्रीराम नगर येथे पाचोरा नगरपालिकेतर्फे नवीन बालोद्यान निर्मीतीचे काम सुरु आहे. ही चांगली बाब असून आम्हाला खुप आनंद होत आहे. परंतु या बालोद्यानास क्रांतिवीर लहुजी सावळे उद्यान असे नाव द्यावे अशी मागणी श्रीराम नगर येथील रहिवाशांनी एका निवेदनाव्दारे यांच्याकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त अशी की श्रीराम नगर वार्ड क्रमांक १२ येथे नगरपालिकेतर्फे ओपन प्लेस जागेवर विकास कामासाठी सुरुवात करण्यात आली असून या ठिकाणी बालोद्यान बनवण्याचा नगरपालिकेचा उद्देश आहे. हा उद्देश चांगला असून या जागेवर विकासकामे करुन सोबतच बालोद्यान बनवण्यासाठी नगरपालिका प्रयत्नशील आहे. ही आमच्यासाठी आनंदाची बाब असून या विकासकामामुळे पाचोरा शहराचे सौदर्यात भर पडणार आहे. व या बालोद्यानास आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल तसेच नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ.शोभाजी बाविस्कर यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. असे येथील रहिवासी यांनी सांगितले.
तसेच सदर जागा विकसीत झाल्यावर सदर जागेला अथवा बालोद्यानास क्रांतिविर लहुजी साळवे उद्यान असे नाव दिल्यास आम्हाला अतिआनंद होईल. सदर महापुरुषाचे नावाचा इतिहास आपणांस ज्ञात असेलच असे नाही. तरी सदर महापुरुषाचे नाव दिल्यास आपलेही नाव समाजात मोठे असेल व केलेल्या कामाची पावती आपणांस जनता नक्की देईलच याची खात्री आहे. म्हणून सदर बालोद्यानास क्रांतिविर लहुजी साळवे यांचे नाव द्यावे हि अशी मागणी अतिशजी चांगरे यांनी केली आहे.