सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›एस.टी.सेवा बंद असल्याने गरीबांची गीतांजली पी.जे.रेल्वे सुरु करण्याची गरज.

एस.टी.सेवा बंद असल्याने गरीबांची गीतांजली पी.जे.रेल्वे सुरु करण्याची गरज.

By Satyajeet News
November 17, 2021
1639
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/११/२०२१

जळगाव जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन रेल्वे म्हणून ओळख असलेली गोरगरिबांची गीतांजली म्हटले तर वावगे ठरणार नाही अशी पी.जे.नॅरोगेज रेल्वे पुन्हा सुरु करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली. कारण कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून ही गाडी बंद करण्यात आली आहे.

या पूर्वी ही पी.जे.रेल्वे पाचोरा, जामनेर, पाचोरा अश्या दिवसाला चार फेऱ्या करत होती. अनेक गोरगरिब, शालेय विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक प्रवास करत होते. पाचोरा ते जामनेर हे तब्बल ५६ कि. मी. अंतर आहे. परंतु या रेल्वे गाडीचे प्रवास भाडे सर्वसामान्य जनतेसाठी परवडणारे होते. तसेच पाचोरा येथून मुंबई, नागपूर, भोपालकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या व पॅसेंजर गाड्यांना कनेक्टेड असल्याने ग्रामीण भागातील गरजूंना खूप फायदेशीर होती.

पाचोऱ्याहून निघाल्यानंतर वरखेडी, पिंपळगाव (हरेश्र्वर), शेंदुर्णी, पहुर, भगदारा, व जामनेर, अशी ती धावत होती. या स्थानकावरुन नियमित चार फेऱ्या सुरु होत्या. परंतु या कोरोनामुळे दोन वर्षांपासून पी.जे.रेल्वे रुळावरुन धावलेली नाही. ही पी.जे.रेल्वे केंद्र सरकारने त्वरित सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.

कारण मागील बऱ्याच दिवसापासून एस.टी.कर्मचारी संपावर उतरले असून सरकार व संपकरी एस.टी.कर्मचारी यांच्यात समझौता होत नसल्याने संप सुरुच आहे. या कारणामुळे दिवाळीच्या सणासुदीला आया-बहिणींना माहेरी जाणे व परत येण्यासाठी प्रवासाचे साधन नसल्याने बऱ्याचशा भगिनींना भाऊबीज साजरी करता आली नाही.

तसेच दैनंदिन जीवनातील अडीअडचणी व सणासुदीला काहींना प्रवास करणे गरजेचे असल्याने कधी मालवाहतूक करणाऱ्या तर कधी खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून प्रवास करत वेळ काढावी लागली. परंतु असा प्रवास करतांना या खाजगी प्रवासी वाहतूक करणारांनी मनमानी भाडे घेऊन गरजवंतांची आर्थिक लुट करत गुराढोरांसारखे कोंबून जीवघेणी प्रवासी वाहतूक केली. तर काहींनी दुचाकीवरून प्रवास करुन वेळेवर कामकाज पार पाडले.

परंतु असा प्रवास करतांना बरेचसे अपघात झाले या अपघातात काहींना जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्व आले सोबतच उपचारासाठी काहींना हजारो तर काहींना लाखो रुपये खर्च करावे लागले.जर का या एस.टी,च्या संपाच्या कालावधीत पी.जे.रेल्वे सुरु राहिली असती तर पाचोरा ते जामनेर दरम्यान असलेल्या शेकडो खेड्यातील जनतेची प्रवासाची अडचण दुर झाली असती.

परंतु सरकार कोणतेही असो जनतेच्या मतावर निवडून आल्यावर सत्ता मिळाल्यावर मात्र कारभार स्वताच्या मतावर चालवतात म्हणून लोकशाही नावालाच उरली असल्याचा भास होतो कारण जनहितार्थ निर्णय घेतले जात नाहीत.

म्हणून आतातरी ब्रिटीशकालीन पी.जे.रेल्वे (गोरगरिबांची गीतांजली) तातडीने सुरु करावी म्हणजे गरजू जनतेच्या जीवाशी खेळ होणार नाही. तसेच आर्थिक लुट न होता सुरक्षित प्रवासाची व्यवस्था होईल.

कमीत कमी प्रवास भाड्यात प्रवास करण्यासाठी पी.जे.रेल्वे त्वरीत सुरु करावी ही जनतेची जोरदार मागणी आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 39
Previous Article

श्री. छत्रपती शिवाजी क्रीडा सांस्कृतिक मंडळ शेंदूर्णी ...

Next Article

नेरी येथे नवीन अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगावआरोग्यक्राईम जगत

    पाचोरा ते अंबे वडगाव रस्त्यावर खड्डे कि खड्ड्यात रस्ते अपघाताची मालिका सुरुच

    October 11, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    निसर्ग व पर्यावरण महिला सखीमंच पाचोरा तालुका कार्यकारणी जाहीर .

    June 25, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा नगरपालिकेने मिल्लत नगर भागात रस्त्यावर टाकला मुरूम.

    July 29, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    भोगवटा २ च्या मिळकती १ मध्ये वर्ग करणारी प्रक्रिया वर्षेभर चालणार :कॉंग्रेस शिष्टमंडळाला प्रांताधिकारी ग्वाही.

    July 5, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    महामंडळाच्या महिला प्रदेश अध्यक्षपदी सौ.भारती सोनवणे अमळनेर यांची निवड.

    January 7, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    अध्यक्ष-जयदीप दादा ननावरे याच्या आदेशाने चिंचपुरे येथील आदर्श शेतकरी पुत्र शिवश्री सचिनभाऊ कोकाटे पाटील यांची पाचोरा तालुका अध्यक्षपदी निवड

    November 6, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • शैक्षणिक

    जि. प. प्राथमिक विद्यामंदिर कोल्हे येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय दप्तर बॅग, पाणी बाटली व शालेय साहित्याचे वाटप.

  • विविध यश निवड

    राज्यस्तरीय ‘शिक्षक रत्न’ पुरस्काराने सौ. ज्योती महालपुरे यांचा गौरव.

  • पाचोरा तालुका.

    दुःखद निधन-अरुण पाटील.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज