शिस्तीचा पगडा घेऊन घडलेले शिक्षक!असा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या वाढदिवसानिमित्त शब्दरुपी कौतुकाची थाप.
दिनांक~०९/०१/२०२२
गती येण्यासाठी आपले “चरण”,प्रगती येण्यासाठी आपले “आचरण” फार महत्त्वाचे असते.
याच चरण आणि आचरणचे जिवंत उदाहरण म्हणजे
आमच्या शिक्षण आघाडीचे पितामह म्हणजे श्री खंडेराव रामभाऊ सोनवणे…!यांना निवृत्त होऊन दहा वर्षे होऊन गेले तरी त्याची रुजवलेली शिस्तिचे धडे देऊन आमच्या सारखे विद्यार्थी घडविले.
शिक्षक म्हणजे संस्कारित समाजनिर्मिती प्रमुख हाेय. आजच्या शिक्षकांना पूर्वी इतका मान-सन्मान मिळत नाही,असं बेंबीच्या देठापासून ओरडून हल्ली सांगितलं जाते. मात्र,80 ते 90 च्या दशकात परिस्थिती विपरीत होती तेव्हा शिक्षकांची तक्रार घरी केली तरी घरचे सद्स्य देखील आणि शिक्षकांना देखील सांगितले जात असे की, याला अजून बदडा (ठोका)असे ठणठणावून सांगितले जात होते. त्यावेळेसचे शिक्षक देखील छडी लागे छम छम विद्या येई घम घम या म्हणी प्रमाणे पिटाळून लावत असे
घोडगाव गावात अध्यापनाचं काम
करणारे के आर सोनवणे सरांना मानणाऱ्या गावकऱ्यांची संख्या माेठी आहे.ते दूरचित्रवाणी आणि संगणक हे गाइडसारखेच शिक्षकांचे स्पर्धक आहेत.कारण आजचा विद्यार्थी या माध्यमांमुळे तुमच्या पेक्षाही ज्ञानाने २५ वर्षे पुढे आहे,या वर्तमानातील वास्तवावर सोनवणे सरांचा विश्वास आहे.म्हणूनच त्यांनी अध्यापन आनंददायी करण्याचा प्रयत्न आपल्या शाळेत केला होता.थेट पाठाला सुरुवात न करता जर हृदयाचा ठाव घेणारी कथा विद्यार्थ्यांना सांगितली तर त्यांच्या लवकर डोक्यात घुसेल,हे मानसशास्त्र त्यांनी चांगलंच ओळखलं होतं.अध्यापनाच्या क्षेत्रात रमलेला हा माणूस वाचन संस्कृतीतही चाैफेर ओळखला जाताे,याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.कार्यतत्परता कुटुंबवत्सलाची जाण असलेला शिक्षक विद्यार्थ्यांना लाभणं ही सुद्धा पुण्याईच लागते,असं माझं स्पष्ट मत आहे.आज सरांचा वाढदिवस,सरांना शाळा सोडायला दहा वर्ष झाली तरीही आजही विद्यार्थी घाबरून असतात ही भीती आदरयुक्त आहे.शाळेत 38 वर्ष सेवा केली परंतु आजही सरांनी कोणत्या हॉटेल वर चहा,नास्ता पान टपरीवर पान खाताना कधीही दिसले नाही हेच त्यांचे शिस्तबद्ध जीवन विद्यार्थ्यांच्या मनात आदरयुक्त भीती निर्माण करते अश्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस माझ्या परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा…! आमच्या सारख्या पालवीला वटवृक्षात रूपांतर करणारे आदरणीय के.आर. सोनवणे सर,नेतृत्व,कर्तृत्व, प्रभुत्व आणि वक्तृत्व या चौरंगी कलांचा संगम के.आर.सोनवणे हा जनहितार्थ आवाज आगामी काळातही अनेर परिसरात घुमतच राहावा हीच श्री प्रभूचरणी आज प्रार्थना.चोपडा तालुक्यात अनेर परिसरात नि:स्वार्थी भावनेने समाजकारण ,सांस्कृतिक काम करणारे यामुळेच शालेय शिक्षण समितीतील तज्ञ संचालक म्हणून कार्यरत असलेले आमचे गुरुवर्य के.आर.सोनवणे
यांचा नामाेल्लेख अग्रक्रमाने करावा लागेल.शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं असलं तरी ते त्यापासून अगदी चार हात लांब असल्याचा प्रत्यय समविचारी लाेकांशी संवाद साधताना हमखास येताे.चार ते पाच अंकी डाेनेशन देऊन इंग्रजी माध्यमाचं शिक्षण घेण्याचं फॅड मागील दोन दशका पासून वाढलेलं होत;परंतु तरी त्यांनी मराठी माध्यमाच्या आपल्या शाळेसाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा जाे ध्यास होता ताे लाखमाेलाचा होता.तशी त्यांची परिस्थितीही हलाखीची तरी ही परोपकाराची भावना, इच्छा शक्तीच्या जोरावर ते नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवून,एखाद्या विद्यार्थ्याचे कपडे फाटलेले असले आणि त्याच्या आई-वडीलांची घेण्याची आर्थिक क्षमता नसेल तर स्वत:च्या किंवा दुसऱ्या कडून पैसे मागून खर्च करून गणवेश, शैक्षणिक साहित्य देणारा हा एक शिक्षणपंढरीचा ध्येयनिष्ठ ‘जेष्ठ वारकरी’ आहे,असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये.
कला,साहित्य,संस्कृती आणि अध्यात्माची ओढ असलेल्या या या माणसाने ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेत अर्थात अनेर परिसरातील प्रसिद्ध सी.बी.निकुंभ हायस्कुल,घोडगाव ता.चोपडा या शाळेतच नोकरीस म्हणून लागले. परंतु त्यांनी नोकरी म्हणजे वेळेवर येणे अध्यापनाचे कार्य करणे आणि आपला वेळ झाल्यावर घरांचे मार्गक्रमन करणे या चौकटीत न राहता आपणही शिस्तीत राहणे आणि विध्यार्थ्यांना देखील शिस्तप्रिय करणे हाच त्याच्या ध्यास आपल्या शाळेत जास्तीत जास्त सांस्कृतिक कार्यक्रम कसे हाेतील, यासाठी त्यांची धडपड सुरू राहत होती.अध्यात्मिक विचारांचा प्रचंड पगडा असल्याने सकाळी खंडेराव महाराज मंदिरात दर्शन घेतले म्हणजे परिसरातील लाेकांशी सकाळी-सकाळी हसतमुखाने संवाद साधणे, कुणाच्या काही तक्रारी असतील तर त्या आपल्या परीने साेडवण्याचा प्रयत्न करणे ही त्यांची खासियत आहेच.सेवाव्रती भावनेने काम करणाऱ्या व्यक्तीला बळ मिळावे म्हणून वाढदिवस, धार्मिक सण,उत्सवांचं औचित्य साधून फाेनवरून शुभेच्छा देण्याचा त्यांना कधीच विसर पडत नाही. ‘जीवनात जाेडलेल्या पैशांपेक्षा जाेडलेली माणसं कैकपटीने महत्वाची असतात’, अशा विचारधारेतून त्यांनी माणसं जाेडण्याचा अन् ती वाचण्याचा छंदही जाेपासला आहे.असं असलं तरी ‘उगवणारा दिवस हा दरराेज नाविण्याचा संदेश देताे. म्हणून संधीची वाट न पाहता, संधीकडेच चालून गेलं पाहिजे असं ते अनेकदा खासगीत चर्चा करताना आपल्या मित्रपरिवाराला सांगतात.
विद्यार्थ्यांनवर लहान भावासारखे प्रेम करण्याचा वसा निरंतर जाेपासल्याने एका हाकेला हो देणारी युवकांची फळी त्यांच्या पाठीशी आहे.युवक जेव्हा एखादा सार्वजनिक कार्यक्रम आयाेजित करतात,तेव्हा मात्र सर युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात म्हणूनच तर त्यांना शालेय शिक्षण समितीवर तज्ञ संचालक म्हणून संधी मिळाली आहे.विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्याची प्रकृती ठिक नसेल तर आस्थेवाईकपणे विचारपुस करून धीर देण्याचा प्रयत्न ते सातत्याने करीत असतात.म्हणूनच तर ते त्यांच्या मित्रपरिवारासह नव्या फळीतील विद्यार्थ्यांच्या आपलेसे झाले आहे. तेथे भेट देऊन संवाद साधल्यावर आपसूक लक्षात येते. माध्यमांमध्ये सामाजिक,वैचारिक मंथन करणारे लेख,बातमी प्रसिद्ध झाली म्हणजे चिकित्सकपणे वाचून तत्काळ प्रभातसमयी दुरध्वनीवरून प्रतिक्रिया नाेंदवण्याचा छंदही त्यांनी गेल्या दशकभरापासून जाेपासला आहे.काही ध्येयवादी व्यक्ती लाैकीकाकडे जाणून-बुजून पाठ फिरवतात.हिरवळ साेडून काटेरी वाटेने चालू लागतात.कीर्तीचा कटाक्ष त्यांना भुरळ घालू शकत नाही.पावलाेपावली किर्ती त्यांना खुणावत असते.पण तिचा माेहपाश झुगारून या व्यक्ती आपल्या ठरलेल्या उद्दीष्टासाठी झगडत राहतात,गरजवंतांच्या हाकेला ‘हो’ देणाऱ्या या हरहुन्नरी व्यक्तीमत्वाला आई जगदंबा उदंड आयुष्य देवाे आणि त्यांच्या अंतर्मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण कराे,अशा वाढदिवसानिमित्त शब्दरूपी शुभेच्छा….!
*सरांना शुभेच्छा देण्यासाठी*-
*88888 61020*
*लतीश बी.जैन,चोपडा* *[पत्रकार]*
◆◆ 9403556861 ◆◆