अवैध धंदे बंदी कायमस्वरूपी बद करण्यासाठी कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीचे सहायक पोलीस निरीक्षकांना निवेदन.
सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~१६/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने मागील सोळा तारखेला झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या व महिलांच्या मागणीनुसार गावातील देशी, विदेशी, गावठी दारू विक्री तसेच सट्टा, पत्ता इत्यादी अवैध धंदे बंद व्हावे म्हणून एकमुखी ठराव मंजूर करून घेतला होता.
या अनुषंगाने काल सायंकाळी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णाजी भोये यांना कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच पती मा.श्री. कैलास भगत, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख मा.श्री. अरुण पाटील, उपसरपंच मा.श्री. अशोक देशमुख, माळी समाज कुऱ्हाड अध्यक्ष डॉ.प्रदीप महाजन यांनी सहायक पोलिस निरीक्षक श्री कृष्णाजी भोये यांना अवैध धंदे बंद करण्यासाठी ठरावाची मुळ प्रत दिली.
गावात शांतता राखावी व कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, म्हणून उपस्थितांनी या वेळी चर्चा केली.
सहायक पोलीस निरीक्षक श्री. भोये यांनी निवेदन स्वीकारत गावात या संदर्भात लक्ष देऊन अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध धाड सत्र राबवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व वेळ प्रसंगी कुऱ्हाड येथे पोलीस चौकी नेमून या ठिकाणी सेवा दिली जाईल.असे आश्वासन दिले. तसेच अवैध धंदे करणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई करीत असतांना कोणत्याही राजकीय व्यक्तीने या संदर्भात त्यांना हस्तक्षेप किंवा पाठबळ देऊ नये असे त्यांनी उपस्थितांना बोलतांना सांगितले.