अनाथांच्या नाथ सिंधुताई सपकाळ यांना कुऱ्हाड येथे सर्वपक्षीय श्रद्धांजलीपर शोकसभा.
सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~०५/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे आज संध्याकाळी सात वाजता महादेव मंदिर येथे स्व. मा.सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. काल रात्री अनाथांसाठी सेवा कार्य करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झाले होते.
त्यांच्या निधनामुळे अख्ख्या महाराष्ट्रासह देशात शोककळा पसरली होती. त्यांच्या जाण्याने समाज सेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आपल्यातून हरपले तसेच अनेक मुले, मुली पोरकी झाली, म्हणून या महान मातेला श्रद्धांजली वाहण्यासाठी आज दिनांक ०५ जानेवारी बुधवार रोजी सायंकाळी सात वाजता कुऱ्हाड खुर्द येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शोकमय वातावरणात श्रद्धांजली पर सभा घेण्यात आली.
याप्रसंगी सरपंच कैलास भगत, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील, उपसरपंच अशोक देशमुख, पत्रकार सुनील लोहार, भाजप जिल्हा वैद्यकीय आघाडीचे डॉ.प्रदीप महाजन, राष्ट्रवादी जिल्हा युवा उपाध्यक्ष सचिन माळी, कडुबा महाजन, प्रहार संघटनेचे आकाश चित्ते, विलास अहिरे, शंतनु भालेराव, गोविंद पाटील, राहुल गायकवाड, अशोक पाटील, उत्तम न्हावी, असंख्य महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.