लोकशाहीचे मारेकरी कोण ? शिवराम पाटील. महाराष्ट्र जागृत जनमंच.
लोकशाहीचे मारेकरी कोण ?
उच्चशिक्षीत लोक आधिकतम शहरात राहातात.त्यात डॉक्टर, इंजिनिअर,वकील, प्रोफेसर असतात.यांची संख्या जळगाव शहरात साधारणतः ३०%असावी.मध्यम शिक्षीत म्हणजे कामापुरते शिक्षीत साधारणतः ४०%असावेत.उरलेले ३०%अल्पशिक्षित व अशिक्षीत असावेत.
यातील अल्पशिक्षित व अशिक्षीत यांच्या साठीच खरी लोकशाहीची गरज आहे. त्यांना स्पीड अप करण्यासाठी ३५प्रकारची अनुदाने सरकार देते. अगदी धान्यापासून शौचालय पर्यंत. तरीही हा सेक्शन सुधारत नाही. कारण तो नेहमीच कटोरा घेऊन सरकार च्या दारात उभा असतो.त्याला मत नसते.पण मताधिकार असतो.अब्रू आणि मताधिकार हे फुकट मिळालेले भांडवल असते.कधीच न आटणारे असते.म्हणून जो देईल त्याच्या कडून मताचे सुद्धा रोख पैसे वसुल करून घेतो.संविधानाची गरज या सेक्शन ला आहे परंतु हाच सेक्शन संविधानिक आधिकार दोन चारशे रूपयात विकून मोकळा होतो.त्यामुळे अशा वस्तीत सुधारणा करण्याची गरज नगरसेवकाला ,आमदाराला वाटत नाही. जळगाव नवीपेठ मधील जसे रस्ते, गटारी आहेत तशा हरिविठ्ठलनगर मधे रस्ते, गटारी बनवल्याच नाहीत.निधी तर दोन्ही ठिकाणी सारखाच मिळतो.तरीही,असा फरक आहे.
या वस्तीत,वार्डात ,प्रभागात सुधारणा करण्याची गरज नसते.तशी मानसिकता नसते.त्या बदल्यात रोख पैसे मिळाले तर त्यांना आवडते.गांव,शहर,प्रांत,देश,धर्म ,न्याय,निती,लोकशाही पेक्षा रोख पैसे देणारे,तुरंत दान करणारे उमेदवार यांना आवडतात. निवडणुकीत कोण किती वाटप करतो याचीच चर्चा करतात.
सरकार बदलण्याचे काम नेहमीच अशिक्षीत, अल्पशिक्षित मतदार करीत असतात. यांचे मत ज्या उमेदवाराला खरेदी करता येते तो उमेदवार निवडणूक जिंकतो.या सेक्शन चे मत कधीच ठाम नसते.मुळात मत नसतेच.ते संविधानाने दिलेले असेट असते.सोयीस्कर दराने विकून खाण्याचे भांडवल असते.लोकशाहीचा नाश हाच सेक्शन करतो.यांच्या मतविक्रीमुळे नगरसेवक आणि आमदार निवडून येतात.त्यामुळेच भारतीय लोकशाही पक्षात गुंड, गुन्हेगार, स्मगलर,अवैध व्यवसायिक यांचा सुळसुळाट झालेला आहे.जळगाव शहरातील आधिकतम महापौर, उपमहापौर अशाच पॉकेटमधून निवडून आलेले आहेत.हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा ,तांबेपुरा,एकतानगर,रामेश्वर कॉलनी, जैनाबाद याच भागातून निवडून आलेले नगरसेवक महापौर, उपमहापौर बनलेले आहेत.जळगाव महानगरपालिकेतील महासभेत मुष्ठीयुद्ध याच भागातील नगरसेवक करतात.
मध्यम शिक्षीत म्हणजे कामापुरते शिक्षीत लोक बहुधा नोकरी करतात. दुकाने चालवतात. त्यांना कमवण्यापुरते कायदे माहिती असतात. हक्क सुद्धा फक्त भांडणापुरते,तक्रारीपुरते माहिती असतात.ते कधीही नगरसेवक व आमदार विरोधात बोलत नाहीत.कॉलनीत, गल्लीत सुरक्षा व्हावी म्हणून हे गुंड,गुन्हेगार,खुनी नगरसेवकांशी नाते सांगतात. ओळख असल्याचे सांगतात. यांच्या मुला मुलींच्या लग्नातील पत्रिकेत याच गुंड,गुन्हेगार, नगरसेवक, आमदाराचे नांव आशिर्वाद कॉलम मधे छापलेले असते.असे गुंड,गुन्हेगार, नगरसेवक, आमदार आले कि,भटजींचा मंत्रोच्चार थांबवून यांचा चरणस्पर्श करतात. हे नवरा,नववधूला कसा आशिर्वाद देत असतील?
हे मध्यम शिक्षीत लोक चावडीवर, हॉटेलमध्ये, गुत्यावर,जेष्ठ नागरिक संघात मात्र नको त्याच्यापुढे तक्रार करतात.पण तेथून उठला कि तेथेच विसरून जातात. त्यामुळे अशा लोकांच्या वस्तीत सुद्धा सुधारणा होत नाहीत. झाल्याच नाहीत.तरीही नगरसेवक व आमदाराशी संबंध असल्याच्या थापा मारून कॉलर टाईट करतात. नोकरीचे कार्यालय, पेपर, टिव्ही यातच आधिकतम जीवन घालवतात.
मध्यम शिक्षीत लोकांचे मत एका बाजूला झुकलेले असते. ते नेहमीच एका पक्षाचे किंवा नेत्याचे बांधील असतात.त्यांचे बालपण,शिक्षण यावरून त्यांचे मत बनलेले असते. जात व धर्मावरून यांचे मत ठरते. ते त्या त्या पक्षाचे खात्रीचे मतदार असतात. यांच्या मुळे प्रत्येक पक्षाला काहीही न करता अपेक्षित,निश्चित मतदान मिळते.आधी हा सेक्शन कांग्रेस कडे होता.आता भाजप कडे आकर्षित झाला आहे.हा सेक्शन धार्मिक, ऐतिहासिक पुस्तके वाचून मत बनवतो.कॉन्झर्व्हेटिव्ह असतो.मेंदूत पुस्तकी डाटा ओसंडून वाहातो.त्यामुळे नवीन डिजीट ला जागा नसते.ही माणसे नेहमीच तणावात असतात.संतापात असतात. पण करीत काहीच नाही. बोलतात खूप पण अर्थ निघत नाही. आपण कोणत्या मताचे,संप्रदायाचे,पंथाचे आहोत हे प्रदर्शित करण्यासाठी कपाळावर त्या त्या डिझाईनचा लोगो उमटवतात.आडवा,उभा,तिरपा,गोल,चौकोनी, त्रिकोणी,आयताकृती, दंडगोल,पैराबोलीक,हायपरबोलीक खंडग्रास,खग्रास,धुमकेतू,त्रिशुळ,साप,विंचू,फुलपाखरू.त्यावरून त्याच्या बोलण्यातील,वागण्यातील,भांडणातील अर्थ निघतो.मेंदूत अतिरिक्त डाटा असल्याने कपाळावर सुरकुत्या उमटतात.हृदयात पोकळी (भयगंड) असल्यामुळे डायबेटिस,ब्लैडप्रेसर,हार्ड अटैक ने ग्रस्त असतात.
शहरातील ३०% लोक डॉक्टर, इंजिनिअर, प्रोफेसर, वकील,व्यापारी हे स्वताला हायफ्रोफाईल समजतात. आपण वरच्या लेव्हलचे आहोत,त्याच थाटात ते वागत असतात. त्यांना कायद्याची,हक्काची माहिती असते.तरीही ते लोकशाहीत इंटरेस्ट घेत नाहीत.नगरसेवक आणि आमदार आधिकतम गुंड, गुन्हेगार असतात,अशी त्यांची खात्री असते.म्हणून यांच्या पासून चार हात लांब राहातात.लोकशाही मुळे नालायक माणसे नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री बनतात. अशिक्षित, अल्पशिक्षित मतदार यांना मत विकून निवडून देतात ,याचा त्यांना राग असतो.म्हणून ते संविधान नाकारतात. रोटरी क्लब,लॉयन्स क्लब,फैन्सी क्लब आणखी बरेच क्लब करुन अमेरिकन लाईफस्टाईल मधे जगू पाहातात. आपण इतर ७०%पेक्षा वेगळे आहोत,या आनंदात जास्त गढलेले असतात.हा वर्ग मतदान करणे,लाईनमधे उभे राहाणे कमीपणाचे समजतात.म्हणून मतदान करीत नाहीत. कोणीही निवडून आला तरी भ्रष्ट असणार, तर मग का मतदान करावे? यामुळे लोकशाही पासून कोसभर दूर असतात.खाजगी गप्पांमधे आभिमानाने सांगतात ,मी मतदान तर सोडा मतदान कार्ड सुद्धा बनवले नाही. सरकार कांग्रेसचे असो किंंवा भाजपचे असो ,यांना काहीच फरक पडत नाही.पुढची पिढी इंग्लंड ,अमेरिकेत जाईल या नियोजनात असतात.शहरात कमाई असेपर्यंत ते या शहराचे असतात.कमाई संपली कि मायग्रेशन करतात.शहर कधीच यांचे नसते आणि हे कधीच शहराचे नसतात.देश यांचा नसतो,हे देशाचे नसतात.गांधीजी, आण्णा हजारेँना थोतांड समजतात.
निवडणूक,विधानसभा, लोकसभा, लोकशाही याबाबतीत या सेक्शन चे मत नेहमीच नकारात्मक, तिरस्कारात्मक असते.शहर कधीच सुधारणार नाही, भारत कधीच सुधारणार नाही. त्यापेक्षा आपण परदेशात गेलेले बरे.असा समज असतो.
या उच्च शिक्षीत सेक्शनने लोकशाहीत सहभाग घ्यावा,असे मला वाटते.लोकशाहीचा ,निवडणुकीचा तिरस्कार करून सुधारणा होणार नाही. त्यात सहभाग घेऊन बदल केला पाहिजे.असा माझा प्रयत्न असतो.म्हणून रोटरी क्लब,,लॉयन्स क्लब,बार असोशियसन,मुक्टो पुक्टो संघटना यात उपस्थिती देऊन आवाहन करतो.या सेक्शन ला इंग्रजीत बोलणे,भाषण करणे आवडते.तेंव्हा त्यांच्यात आपलेपणा निर्माण होतो.म्हणून तर मेट्रोपालिटन सिटीत दिल्लीत उच्चभ्रू लोकांनी अरविंद केजरीवाल यांना स्विकारले. कि हा माणूस आपल्यातील आहे.
वनभोजन ठिकाणी एका वकील नगरसेवकाची भेट झाली. नावापुढे एडव्होकेट असल्यामुळे माझी उत्सुकता वाढली.सापडला एक उच्चशिक्षीत नगरसेवक. विचारले तर म्हणाला, काका,मी माझ्या शिक्षणामुळे नाही निवडून आलो.मी मते विकत घेण्याची ऐपत दाखवली.मला पक्षाने तिकीट दिले.मी निवडून आलो.मी स्वतः अपक्ष उमेदवारी केली तर निवडून येणारच नाही. त्यामुळे महासभेत मी ब्र काढू शकत नाही. एका कोपऱ्यात बसून असतो.शिवाजीनगरमधे बुद्धीमान, प्रामाणिक माणूस आवडत नाही. म्हणून मी सुद्धा अशिक्षीतांचे नेतृत्व स्विकारले.
घरकुल घोटाळातील एक नगरसेवक इंजिनिअर आहे.त्यांना विचारले, तुम्ही तर उच्च शिक्षीत आहात.तरी कशी काय सहमती दिली.म्हणाले, घरकुल चा ठराव रात्री अकरा वाजता शिवाजनगरमधे लिहीला गेला.माजी सही नगरपालिका इमारतीच्या पायरीवर घेतली.ठराव न वाचता मी गुमान सही केली.कारण मला त्यांनी निवडून आणले होते.म्हणून मी यात अडकलो.जेलमधे जाऊन आलो.बदनाम झालो.
जळगाव नगरपालिकेत एका एम डी डॉक्टरला स्विकृत नगरसेवक नियुक्त केले.त्यांना मी विचारले तर म्हणाले, मला नगरपालिका महासभेत चकार शब्द बोलू दिले नाही. मला का स्विकृत केले ते शेवटपर्यंत समजले नाही.
जळगाव शहरातील वकील,डॉक्टर, इंजिनिअर हे गुंड,गुन्हेगारांचे नेतृत्व स्विकारतात तेंव्हाच नगरसेवक निवडून येतात किंवा स्विकृत केले जातात. ही गुंडगिरी, गुन्हेगारी मोडून काढणे आवश्यक झाले आहे.यासाठी उच्च शिक्षीत लोकांनी निवडणुकीत, लोकशाहीत सहभाग घेतला पाहिजे. अलिप्त राहून अपेक्षित बदल होणार नाही.
मला परवा रोटरी क्लबमधे बोलवले.सांस्कृतिक संमृद्धी आणि माझे जळगाव या विषयावर फक्त तीन मिनीटे बोलण्याची वेळ दिली.कृपया राजकीय संस्कृती वर बोलू नका,अशी सुचना केली.किती भय आहे?मी म्हणालो,या भयग्रस्त अवस्थेत कोणतीही संस्कृती टिकत नाही. वाढत नाही. उलट भयग्रस्त अवस्था हिच संस्कृती नसून विकृती असते.असे सामाजिक मानसशास्र सांगते.जेथे भाकरीसाठी अब्रू विकावी लागते तेथे संस्कृती टिकणार कशी?जेथे पैशासाठी मत विकावे लागते तेथे लोकशाही टिकणार कशी? असा माझा सवाल आहे. त्याचे उत्तर आम्ही शोधत आहोत.त्यावर इलाज आम्ही करीत आहोत.म्हणून उच्च शिक्षीत लोकांना सोबत बोलवत आहोत.हा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आजार घालवण्यासाठी सोशल सायकॉलॉजी अभ्यासण्याची नितांत गरज आहे.
….शिवराम पाटील.
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच.