दिपावलीच्या शुभमुहूर्तावर मोबाईल शौकिनांची, न्यू सेंट्रल पॉईंट मोबाईल शॉपवर उसळली गर्दी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/११/२०२३

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिपावलीच्या शुभ मुहूर्तावर नवनवीन कपडे, घरातील सुखवस्तू, नवीन घर, दागदागिने खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र आता प्रगत व इंटरनेटच्या जमान्यात मोबाईल ही सुखवस्तू समजून घेण्याचा कल वाढला आहे. अशाच दिपावलीच्या सणानिमित्त पाचोरा शहरासह खेड्यापाड्यातील मोबाईल घेण्यासाठी शौकिनांची एकच गर्दी दिसून येत होती.

परंतु कोणतीही किंमती वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गेल्यावर जो तो आपल्या विश्वासातील ठिकाणीच वस्तू खरेदी करण्यासाठी प्राधान्य देतात. अशाच मोबाईल खरेदीदारांनी यावर्षी पाचोरा शहरातील श्री. छत्रपती महाराज चौकात नाश्ता व उत्कृष्ट चहासाठी प्रसिद्ध असलेल्या निलम हॉटेलच्या बाजूला समाजसेवक नशिर काका बागवान यांच्या दुकानात तीन वर्षांपूर्वी नव्याने सुरु करण्यात आलेल्या न्यू सेंट्रल पॉईंट मोबाईल शॉपवर एखच गर्दी केली होती.

याबाबत न्यू सेंट्रल पॉईंट मोबाईल शॉपचे संचालक यांच्याशी संवाद साधला असता आम्ही सर्व ग्राहकांना योग्य व रास्त किंमतीमध्ये मोबाईल देत आहोत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबातील लोकांचा मोबाईल खरेदीकडे कल वाढला आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा मोबाईल घेते तेव्हा त्यापैकी बऱ्याचश्या ग्राहकांना मोबाईल कसा हाताळायचा याची माहिती नसते म्हणून आम्ही संबंधित ग्राहकांना मोबाईल विकत दिल्यानंतर त्यांना पाहिजे त्या सुविधा म्हणजे व्हॉट्सॲप व इतर ॲप डाऊनलोड करुन देत सगळी माहिती देण्यासाठी स्वतंत्रपणे दोन माणसांची व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. तसेच बजाज फायनान्स कंपनीच्या माध्यमातून मोबाईल घेण्यासाठी सुविधा उपलब्ध असल्यामुळे आमच्याकडे ग्राहक विश्वास ठेऊन मोबाईल खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत.

तसेच माझ्या दुकानात कादरखान सलीम खान व काम करणारे माझे सहकारी व मित्रमंडळी यांच्या संपर्कातून माझा व्यवसाय भरभराटीला आला असल्याचे सांगितले.

ब्रेकिंग बातम्या