अल्पवयीन विवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई व्हावी. अनिस तर्फे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांकडे मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०७/२०२१
जळगांव येथील अल्पवयीन मयत विवाहीता सौ. करीना सागर निकम उर्फ कु.करीना समाधान भालेराव ह्या अल्पवयीन मुलींच्या इच्छेविरुद्ध बळजोबरीने सागर निकम राहणार जळगांव यांचेबरोबर विवाह झाला होता. सदर विवाहीतेस सासरच्या मंडळीकडुन माहेरुन पैसे आणावेत या कारणावरून सतत मानसिक शारिरीक त्रास दिला जात असल्याने सदरचा त्रास असाह्य झाल्याने करीना हीने आत्महत्या करुन स्वताचे जिवन संपवले, किंवा तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, किंवा तिचा खुन करुन आत्महत्येचा बनाव केला, असा संशय व्यक्त केला जात असून अशा या कृत्याची बारकाईने निपक्षपातीपणे चौकशी करुन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येवुन अन्यायग्रस्त मयत विवाहीतेस व तिच्या कुटुंबीयास न्याय मिळवून देण्यात यावा या मागणीचे निवेदन अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश अध्यक्ष मा.श्री.रवींददादा जाधव यांचे आदेशानुसार जळगांव शिष्टमंडळाने जळगांव जिल्हाधिकारी साहेब, जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना समक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा करुन निवेदन सादर केले.
या शिष्टमंडळात अनिस च्या जळगांव जिल्हाध्यक्षा .सिमाताई जाधव, जिल्हा कार्याध्यक्षा सौ.मनिषाताई पाटील, जिल्हा संघटक फिरोजा ताई शेख, जेष्ठ पदाधीकारी श्री.सुदीप पवार, जिल्हा सल्लागार श्री.हर्षल पाटील, महानगर प्रमुख इरफान शेख,जेष्ठ नेत्या सौ.भारतीताई कापडणे, जिल्हा सल्लागार नसरीन पिरजादे, समितीच्या पदाधीकारी संगीता मोरे, आद.पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.