अंबे वडगाव येथे रविवारी भरणारा आठवडे बाजार आता सोमवारी भरणार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/१२/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे मागील काही महिन्यांपासून प्रत्येक रविवारी आठवडे बाजार सुरु करण्यात आला होता. हा बाजार सुरु केल्यामुळे गोरगरिबांच्या बऱ्याचशा अडिअडचणी दुर होऊन गावातच बाजार भरत असल्याने प्रवासभाडे खर्च कमी होऊन दिवसभर काम करुन सायंकाळी बाजार करता येते असल्याने रोजंदारी बुडत नव्हती म्हणून हा रविवार भरणारा आठवडे बाजार पंचक्रोशीतील गावकऱ्यांसाठी फायदेशीर होता.
मात्र या बाजारात येणाऱ्या व्यावसायिकांसाठी रविवार हा दिवस अडचणींचा ठरत होता. यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भाजीपाला व्यवसायिकांचा होता. कारण रविवार असल्याकारणाने पाचोरा येथील भाजीपाला मार्केट बंद असायचे यामुळे भाजीपाला व्यवसायिकांना ताजा भाजीपाला उपलब्ध होत नसल्याने बरेचसे व्यवसायिक इच्छा असूनही या बाजारात येऊ शकत नव्हते तसेच रविवार रोजी जवळच पहूर येथील आठवडे बाजार असतो यामुळे येणाऱ्या दुकानांची संख्या कमी होती.
विशेष म्हणजे रविवार हा दिवस आठवडे भरातील हिशोब व लेखाजोखा करण्यासाठी व थोडासा आराम करण्यासाठी योग्य असल्याचे मत व्यवसायिकांनी सांगितले होते. म्हणून आता अंबे वडगाव येथील रविवार रोजी भरणारा आठवडे बाजार रविवार ऐवजी सोमवार रोजी भरवण्यात येणार आहे. कारण सोमवार हा दिवस व्यापाऱ्यांसाठी सोयीचा आहे. तसेच आसपासच्या पंचक्रोशीतील गावातून कुठेही आठवडे बाजार भरत नसल्याने जास्तीत, जास्त व्यवसायिक अंबे वडगाव येथील सोमवार रोजी भरवण्यात येणाऱ्या आठवडे बाजारात येऊ शकतात.
म्हणून पाचोरा, जामनेर, सोयगाव तालुक्यातील सर्व व्यवसायिकांनी याची नोंद घेऊन येत्या २६ डिसेंबर २०२२ सोमवार रोजी आठवडे बाजारात आपापली दुकाने लाऊन सहकार्य करावे तसेच भविष्यात प्रत्येक सोमवारी बाजारात आपला व्यवसाय कायमस्वरूपी सुरु ठेवावा म्हणजे ग्रामपंचायतीकडून आपल्यासाठी योग्य त्या उपाययोजना व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सोयीचे होईल असे आवाहन अंबे वडगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केले आहे.