अंबे वडगाव येथील शेकडो तरुणांचा आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१०/२०२३

पाचोरा, भडगाव तालुक्यात विकासकामांचा झंझावात सोबतच सतत जनसंपर्कातून गोरगरीब, गरजू, दीन, दुबळ्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी दिवसरात्र झटणारे तसेच गाव तेथे व्यायामशाळा, वाचनालय इतर विकास कामांचा धडाका सुरु केला असल्याने पाचोरा, भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांना जनमानसातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत असून आज पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील शेकडो तरुणांनी आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

यात अंबे वडगाव येथील संजय देवरे, डॉ. श्यामकांत पाटील, बबलू तडवी, अमोल पाटील, शशिकांत पाटील, नितीन निकम,राहुल निकम, संतोष शिंदे, प्रमोद पाटील, सुनील वाघ, किसन देवरे, दिपक पाटील, बाळू पाटील, अभिषेक मराठे, गणेश मराठे, वाल्मिक जाधव, अरबाज पठाण, शुभम मराठे, अनुपम मराठे, राहुल मराठे, कुणाल मराठे, लकी मराठे, कमलेश सोनवणे, संदेश सोनवणे, पंकज पाटील, देवानंद कोळी, पवन जगताप, संतोष पाटील, समाधान पवार, आशिक खाटिक, अमजद पठाण, सारंग देवरे, अविनाश देवरे, विश्वनाथ जोहरे, रवींद्र खैरनार, जितू सोनवणे, गोपाल सूर्यवंशी, नितीन सूर्यवंशी, नवल पाटील, गजानन देवरे आदींनी आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारले आहे.

ब्रेकिंग बातम्या