पाचोरा पोलीस स्टेशनला मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०३/२०२४
पाचोरा हे तालुक्याचे मोठ्या लोकसंख्येचे शहर असून पाचोरा पोलीस स्टेशनला मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक नसल्याने शहराचाच नव्हे तर जवळपास ८५ गाव, खेड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पाचोरा हे तालुक्याचे ठिकाण असून या शहराची सह जवळपास ८५ खेड्यापाड्यातील कायदा सुव्यवस्था व सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पाचोरा पोलीस स्टेशनला अद्यापही पोलीस निरीक्षकांची नियुक्ती झाली नसल्याने नगगरदेवळा पोलीस चौकी व या पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या २२ खेड्यांची तसेच सामनेर, माहिजी, लोहटार व खडकदेवळा या चार बीट मध्ये प्रत्येकी १५ गावांचा समावेश असल्याने या सर्व ६० गावांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पाचोरा शहराची तसेच पाचोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांची भौगोलिक परिस्थिती पाहता खुप मोठा परिसर येतो. तसेच पाचोरा येथे रेल्वे स्थानक, बाजारपेठ, शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, बसस्थानक, पाचोरा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या शहरात शासकीय कामासाठी, दैनंदिन कामासाठी येणारांची संख्या तसेच शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता पाचोरा पोलीस स्टेशनला मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक नसल्याने सद्यस्थितीत या पोलीस स्टेशनचे कामकाज जामनेर येथील पोलीस निरीक्षक मा. श्री. किरण शिंदे साहेब हे पहात आहेत.
असे असले तरी थोड्याच दिवसात येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता लवकरच आचारसंहिता लागणार असल्याने पाचोरा शहरासह तालुक्यातील कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी सक्षम अधिकारी असणे गरजेचे आहे त्यातल्या त्यात नगगरदेवळा पोलीस चौकी व सामनेर, माहिती, लोहटार, खडकदेवळा या बिटचे कामकाज पाहतांना सक्षम अधिकारी नसल्याने उपनिरीक्षक, सहाय्यक फौजदार, बिट अंमलदार व पोलीस कर्मचाऱ्यांना काम करतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. म्हणून पाचोरा पोलीस स्टेशनला लवकरात लवकर पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी पाचोरा शहरातील तसेच पाचोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावागावातून होत आहे.
(मागील काळात पाचोरा पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्तव्यदक्ष म्हणून आपली ओळख निर्माण करणारे मा. श्री. सचिन सानप यांना बढती मिळाली असून ते सद्यस्थितीत पहूर पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत आला असल्याने पाचोरा पोलीस स्टेशनला त्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.)