लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाच्या अनागोंदी कारभाराबाबत लोहारीच्या सरपंचांनी केली थेट शिक्षण सचिवांकडे तक्रार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०३/२०२४
पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन संचलित दत्त माध्यमिक विद्यालयाचे नवनवीन कारनामे समोर येत असून यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने लोहारी गावच्या सरपंच व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून लोहारी गावच्या सरपंच सौ. रंजनाताई प्रविण पाटील यांनी मा. शिक्षण सचिव शिक्षण विभाग माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन पाचोरा संचलित दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संचालकांनी कोणतीही रितसर परवानगी न घेताच लोहारी येथील जिल्हापरिषदेच्या शाळेवर मागील चार वर्षांपासून अनाधिकृतपणे ताबा घेऊन या जिल्हापरिषदेच्या शाळेत दत्त माध्यमिक विद्यालय सुरु केले आहे. असे असले तरी ही शाळा म्हणजे नुसता कोंडवाडा आहे की काय असे मत लोहारी येथील संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी व्यक्त केल असून शाळेची एक खोली पडकी आहे. शाळेचे इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग आहेत मात्र शाळा खोल्या तीनच असल्याकारणाने एका, एका वर्गात दोन, दोन वर्ग बसवले जात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मैदान, स्वच्छतागृह, स्वयंपाकघर व्यवस्थीत नाही, शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, अपंग मुलांसाठी रॅम्प, शाळेला कुंपण, वर्गात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच तसेच विज्ञान शाळा व इतर सुविधा नसल्याचे सांगितले.
कारण या बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन पाचोरा संचलित दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संचालकांनी मनमानी कारभार सुरु करत जिल्हापरिषदेच्या मराठी मुलांच्या शाळेवर मागील चार वर्षांपासून अनाधिकृतपणे ताबा घेतला असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहिजे त्या सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत तसेच शिक्षक संख्या अपुर्ण असून यात मुख्याध्यापकासह तीन शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित संस्था चालकांना वारंवार लेखी व तोंडी सुचना देऊनही अद्यापही शिक्षक भरती करण्यात आलेली नाही. मागील चार वर्षांपासून बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन पाचोरा संचालकांनी लोहारी येथील जिल्हापरिषदेच्या मराठी मुलांच्या शाळेवर मागील चार वर्षांपासून अनाधिकृतपणे ताबा घेतला असून आजपर्यंत इमारत भाड्याने घेण्यासाठी लागणाऱ्या तरतूदींची पुर्तता केली नसून अद्यापपर्यंत शाळा खोल्यांचे भाडे जिल्हा परिषदेकडे दिलेले नाही. विशेष बाब म्हणजे दिनांक ०१ व १२ जानेवारी २०२४ रोजी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या आहेत परंतु अद्यापही कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या मासिक मीटिंगमध्ये बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनच्या मनमानी कारभाराबाबत सविस्तर चर्चा करुन सदरची शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याबाबत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
शाळेच्या इतर कामातही मोठ्या प्रमाणात घोळ असून फक्त कागदी घोडे नाचवून कागदपत्रांची पूर्तता करुन शासनाच्या पैशांची लूट केली जात आहे. यांचेच जीवंत उदाहरण म्हणजे कल्याणराव बोरसे नामक एक व्यक्ती हे बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन पाचोरा संचलित दत्त माध्यमिक विद्यालय लोहारी येथे कागदोपत्री शिपाई पदावर कार्यरत आहे. परंतु कल्याणराव बोरसे हे आजपर्यंत एकही दिवस लोहारी येथे कामावर हजर रहात नसून ते दुसरीकडेच कुणाचे तरी कल्याण करत फिरतात मात्र पगार बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन कडून घेतात परंतु पगार देतांना संस्थेचे अध्यक्ष हे अर्धा पगार स्वताहा ठेवून घेतात असा आरोप सरपंचांनी केली आहे.
तक्रारीची दखल घेऊन मागील महिन्यात २९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिक्षणाधिकारी (माध्यमिक शिक्षण विभाग) जिल्हापरिषद जळगाव कार्यालयातून मा. बच्छाव साहेब व मा. शेख साहेब हे चौकशी कामी आले असता त्यांनी तक्रारदाराला समोर बोलावून विश्वासात घेऊन चौकशी न करता दत्त माध्यमिक विद्यालयात येऊन विद्यार्थी व उपशिक्षकांवर दबाव आणून एकतर्फी चौकशी करुन निघुन गेले असल्याने संस्थाचालकांनी खोटी माहिती देऊन चौकशी अधिकाऱ्यांची दिशाभूल केली असल्याचा आरोप करत या चौकशीअंती काहीतरी आर्थिक देवाणघेवाण करुन घेत आर. टी. ई. मंजूर करुन देण्यात आला असल्याचा संशय सरपंच सौ. रंजजाताई पाटील यांनी व्यक्त केला करत इन कॅमेरा चौकशी करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन मा. दिपक केसरकर साहेब शिक्षणमंत्री (माध्यमिक व उच्च माध्यमिक) मंत्रालय मुंबई, मा. शिक्षण संचालक साहेब (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, मा. जिल्हाधिकारी साहेब जळगाव जि. जळगाव, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परीषद जळगाव, म. गट विकास अधिकारी पंचायत समिती पाचोरा यांच्याकडे पाठवले आहे.