• 5
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१८/०२/२०२४ पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी गावात नळांना दुषित पाणी पुरवठा केला जात असल्याने भोकरी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दुसरीकडून पाणी आणून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागते आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी गावाला बिल्धी धरणातून पाणीपुरवठा केला जातो परंतु मागील आठवड्यापासून भोकरी गावातील काही ...
  • 7
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१८/०२/२०२४ पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला जुने व खराब संगणक असल्याकारणाने पोलीस स्टेशनच्या महत्वाच्या कामांमध्ये अडथळा येत असल्याने कार्यालयीन कामकाज तसेच फिर्याद नोंदवून घेणे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल व माहिती पाठवणे अवघड झाले असून वेळेवर कामे होत नसल्याने तक्रारदार नागरिकांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी हतबल झाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तसेच ...
  • 1
    0

    प्रा. योगिता चौधरी.(शेंदुर्णी) दिनांक~१८/०२/२०२४ जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील अ. र. भा. गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी दिलेल्या मान्यतेनुसार दिनांक ०९ फेब्रुवारी २०२४ शुक्रवार ते १५ फेब्रुवारी २०२४ गुरुवार या कालावधीत विविध व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष व्याख्यानमालेसाठी पंकज महाविद्यालय चोपडा तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी ...
  • 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१६/०२/२०२४ महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेतर्फे जळगाव जिल्ह्यातील चार शिक्षकांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रविवार रोजी, धुळे येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील चार शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी खासदार, ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेची नाशिक विभागीय “शिक्षण ...
  • 8
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१६/०२/२०२४ पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पनची पिल्लावळीने धुमाकूळ घातला असून पाचोरा, भडगाव, जामनेर तालुक्यात दररोज हजारो हिरव्यागार वृक्षांची स्वयंचलित मिशनच्या साह्याने विनापरवाना दिवसाढवळ्या बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. ही वृक्षतोड जामनेर, शेंदुर्णी, लोहारा, पाचोरा, भडगाव या लाकुड वखारींच्या संचालकांच्या छत्रछायेखाली व कृपाशीर्वादाने केली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कारण या तिघही तालुक्यातील ...
  • 2
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१६/०२/२०२४ पाचोराचे तहसीलदार मा. श्री. चव्हाण के साहेबांची बदली झाल्यापासून त्यांच्या जागेवर आजपावेतो नवीन तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली नसल्याने तहसीलदार यांच्या अखत्यारीत येणारी सर्व कामे खोळंबली असून बरीचशी कामे रामभरोसे सुरु आहेत. पाचोरा तालुक्याचे तहसीलदार पद रिक्त असल्याकारणाने वाळू माफिया, विरप्पनची पिल्लावळ तसेच पुरवठा विभागात अनागोंदी कारभार सुरु असल्याने रेशन माफिया मस्तावले आहेत. ...
  • 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१६/०२/२०२४ पाश्चात्य संस्कृतीनुसार १४ फेब्रुवारी हा दिवस अनेक ठिकाणी व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्यात येतो. मात्र पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये या चुकीच्या संस्कृतीला आडफाटा देण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये चांगली संस्कृती व विचार रुजवण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस मातृ, पितृ दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ बुधवार ...
  • 2
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१५/०२/२०२४ पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे कपाशीच्या गाडीवर हमाली करणाऱ्या मजुराच्या डोक्यात एका कापूस व्यापाऱ्याने फरशी मारुन दुखापत केल्याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित जखमीला प्रथम पाचोरा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र संबंधित जखमी इसमाच्या डोक्याला अस्थिभंग झाला असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असून ...
  • 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१४/०२/२०२४ अंबे वडगाव ते शेंदुर्णी रस्त्यावर अंबे वडगाव गावाजवळील दिलीप जैन यांच्या शेताजवळ मागिल महिन्यापासून पिंपळगाव हरेश्वर येथील शालीकराम मालकर यांनी हॉटेल प्रधान नावाने अधिकृतपणे बिअर बार सुरु केला आहे. या हॉटेल प्रधान मध्ये खवय्यांची गर्दी जमू लागली असून शालीकराम मालकर यांनी सुरु केलेल्या हॉटेल व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र अशातच दिनांक ...
  • 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१३/०२/२०२४ नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी काल दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ सोमवार रोजी पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्थेला भेट देऊन शिक्षक बांधवांशी हितगुज केली. याप्रसंगी गिरणाई शिक्षण संस्थेचे संचालक तथा सहकार नेते सतीश बापू शिंदे यांनी आमदार सत्यजित तांबे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पि. के. शिंदे ...