Monthly Archives: January 2024
-
खडकदेवळा हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केली विविध कलागुणांची उधळण.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३१०/०१/२०२४ पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील माध्यमिक विद्यालयात आज दिनांक ३१ जानेवारी २०२४ बुधवार रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि विश्वासराव स्ट्रस्टचे आद्य संस्थापक स्व. श्रीमंत आबासाहेब के. एस. पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करुन मोठ्या उत्साहात स्नेहसंमेलनाला सुरवात करण्यात आली. ... -
जळगावचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची बदली, नुतन पोलीस अधिक्षक पदी एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३१/०१/२०२४ जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या बदलीचे आदेश आज दिनांक ३१ जानेवारी बुधवार रोजी प्राप्त झाले असून त्यांची सोलापूर शहर पोलिस आयुक्तीपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जळगाव पोलीस अधीक्षक पदी बृहन्मुंबई येथे पोलीस उपयुक्त असलेले एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती आदेश शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी ... -
पाचोरा येथे उबाठा सेनेतर्फे खास महिलांसाठी धम्माल मजेदार कार्यक्रम न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३१/०१/२०२४ पाचोरा येथील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी मकर संक्रांतीचे औचित्य साधून खास महिलांसाठी हळदी, कुंकू समारंभ आयोजित केला असून याच दिवशी महिलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ गुरुवार रोजी सायंकाळी पाच ते दहा या वेळेत भडगाव रोड येथील मातोश्री कैलादेवी मंदिरा शेजारील पटांगणावर ... -
राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याच्या हत्येचा जामनेर तालुका वकील संघाकडून निषेध.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३०/०१/२०२४ सद्यस्थितीत महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचे जाणवते आहे. कारण मागील दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत डॉक्टर, पत्रकार, लोकप्रतिनिधी, ज्यांच्या खांद्यावर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेची महत्वाची जबाबदारी आहे अश्या महत्वाच्या पोलीस विभागातील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांवर दिवसाढवळ्या जीवघेणे हल्ले होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नसून न्याय मंदिरात काम करणारा वकील ... -
शेंदुर्णी येथील सुनील भास्करराव गरुड यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुःख निधन.
दिनांक~३०/०१/२०२४ जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील आदर्श शेतकरी, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन, पाचोरा येथील विध्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक राष्ट्रवादी जिल्हा आघाडी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सागर दादा गरुड व सारंग गरुड यांचे वडील सुनील भास्करराव गरुड यांचे काल दिनांक २९ जानेवारी २०२४ रविवार रोजी पुण्यात असतांना सकाळी चार वाजेच्या सुमारास वयाच्या ६३ व्या वर्षी ... -
डॉ. सुरजमलजी झंवर यांचे दुःख निधन.
दिनांक~२९/०१/२०२४ पाचोरा येथील तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यातील पहिले एम. बी. बी. एस. डॉ. अनिल झंवर, सौ. स्मिता यांचे वडील व डॉ. अंकुर झंवर याचे आजोबा डॉ. सुरजमलजी रामदयालजी झंवर यांचे काल दिनांक २८ जानेवारी २०२४ रविवार रोजी सायंकाळी ०५.१५ वाजता वयाच्या ९७ व्या वर्षी वृध्दपकाळाने दुःख निधन झाले. अंत्य यात्रा:- आज दिनांक २९ जानेवारी ... -
श्रीमती सुवर्णा पाटील लिखित “सुंदर हस्ताक्षर” पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२८/०१/२०२४ पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित कै. सौ. सा. प. शिंदे प्राथमिक विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती सुवर्णा पाटील लिखित “सुंदर हस्ताक्षर” या पुस्तकाचे प्रकाशन आज दिनांक २८ जानेवारी २०२४ रविवार रोजी प्राचार्य बी. एन. बापू पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या ... -
एक अधिकारी घेतो हप्ते तर दुसरा करतो कारवाई, मस्तावलेले अवैध धंदेवाईक करतात अधिकाऱ्यांसोबत हातापायी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२८/०१/२०२४ पाचोरा तालुक्यातील गाव खेड्यापाड्यातील हॉटेल, पानटपरी, ढाबा व गावागावात भर वस्तीत अंगणवाडी, मराठी मुलांच्या शाळा इतर शैक्षणिक संस्था व धार्मिक स्थळांजवळ मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात गावठी, देशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे. याबाबत वारंवार आवाज उठवून सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी म्हणजेच दारूबंदी विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई केली ... -
कळमसरा गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गटारीचे पाणी रस्त्यावर, ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०१/२०२४ पाचोरा तालुक्यातील कळमसरा हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून काही भागात सांडपाण्याच्या गटारीची दुरावस्था झाली असल्याने गाव परिसरात सांडपाणी रस्त्यावर येऊन मोठे डबके साचले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की कळमसरा गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तसेच आबा माधव चौधरी, देवानंद तोताराम सोनवणे ... -
पाचोरा येथील सुषमा पाटील यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०१/२०२४ पाचोरा येथील कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका सुषमा पाटील यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचा राज्यस्तरीय नागरीरत्न विभागातील शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय व्यंकटराव जाधव यांनी ह्या पुरस्काराची घोषणा केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेची नाशिक विभागीय भव्य शिक्षण परिषद व पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ११ ...