अंबे वडगाव येथील हॉटेल प्रधान येथून जनरेटरचा डायनामा चोरीला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०२/२०२४
अंबे वडगाव ते शेंदुर्णी रस्त्यावर अंबे वडगाव गावाजवळील दिलीप जैन यांच्या शेताजवळ मागिल महिन्यापासून पिंपळगाव हरेश्वर येथील शालीकराम मालकर यांनी हॉटेल प्रधान नावाने अधिकृतपणे बिअर बार सुरु केला आहे. या हॉटेल प्रधान मध्ये खवय्यांची गर्दी जमू लागली असून शालीकराम मालकर यांनी सुरु केलेल्या हॉटेल व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मात्र अशातच दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रविवार रोजी रात्री १२ वाजेपासून तर दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ सोमवारी सकाळपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यानी जनरेटरचा डायनामा चोरुन नेल्याची घटना सकाळी हॉटेल मॅनेजर व कर्मचारी हे हॉटेलवर आल्यानंतर लक्षात आली आहे. यामुळे हॉटेल मालकाचे अंदाजे विस हजार रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
याबाबत अंबे वडगाव परिसरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून अंबे वडगाव परिसरात मागील वर्षी एक चारचाकी पिक अप गाडी चोरीला गेली असून मागील सहा महिन्यात शेतातील विद्युत पंप व स्टार्टर चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र या झालेल्या चोऱ्यांबाबत कोणीही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली नसल्याने चोरांचे फावले आहे. कारण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल नसल्याने पोलीस पुढचे पाऊल उचलू शकत नाहीत.
(परंतु या हॉटेल प्रधान येथून चोरीला गेलेला जनरेटरचा डायनामा चोरुन नेतांना पिक अप रिक्षाचा वापर करण्यात आला असून ही चोरी करणारे चोरटे हे पंचक्रोशीतील असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.)