Monthly Archives: February 2024
-
सकाळी फिरायला गेलेल्या पत्रकाराचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~११/०२/२०२४ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रमोद हिंम्मत सोनवणे वय ४२ यांचे सर्पदंश झाल्याने मृत्यू ओढवल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे देखील अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यामुळे सोनवणे परिवारावर मोठा आघात झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव येथील रहिवासी असलेले प्रमोद ... -
सौ. वैशालीताई सुर्यवंशी पाचोरेकरांसाठी ठरल्या भगीरथ, टॅंकर पूजन करुन केला मोफत जलसेवेचा शुभारंभ.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०२/२०२४ सद्यस्थितीत उन्हाळ्याची चाहूल लागताच मागील काही दिवसांपासून पाचोरा शहरवासीयांना भिषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हि बाब लक्षात घेऊन पाचोरा वासियांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागु नये म्हणून व आपणही या समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनात बाळगून उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी स्वखर्चाने टॅंकरच्या माध्यमातून मोफत ... -
पाचोरा शहराच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी, आजी, माजी आमदारांच्या प्रयत्नांना यश. उद्या सुटणार गिरणा धरणातून दुसरे आवर्तन.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०२/२०२४ -
आज विसुसावि परिवारातर्फे “अमृत महोत्सव आईचा” या सोहळ्याचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०९/०२/२०२४ सद्यस्थितीत धावपळीच्या जीवनात माणूस जवळ असुनही बरेच दिवस एकमेकांशी भेटु वा बोलु शकत नाही. यामुळे नवीन पिढीला आपले आईवडील, आजी, आजोबा यांची ओळख व्हावी तसेच महाराष्ट्राच्या थोर महापुरुषांनी जोपासलेली संस्कृती, विचार, आदर्श, संस्कार व कर्तृत्ववाचा वारसा जोपासण्यासाठी तसेच वारसा नवीन पिढीने अंगीकृत करण्यासाठी, या कार्यक्रमानिमित्त तीन पिढ्या एकत्रित येऊन गाठीभेटी होऊन ओळख ... -
शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयात सहा दिवसीय आत्मनिर्भर युवती कार्यक्रमाला सुरुवात.
डॉ. योगिता चौधरी.(शेंदुर्णी) दिनांक~०९/०२/२०२४ आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालया अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यातर्फे दिनांक ०९ फेब्रुवारी शुक्रवार ते १५ फेब्रुवारी गुरुवार २०२४ या सहा दिवसीय आत्मनिर्भर युवती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या सहा दिवसीय कार्यक्रमात दररोज वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानमालेचा शुभारंभ आज ... -
घरासमोर शिवस्मारक बांधण्यात येणार असल्याने मनस्थाप होऊन वरखेडी येथील एका व्यवसायीकाला ह्रदयविकाराचा झटका.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०९/०२/२०२४ सद्यस्थितीत महाराष्ट्रातील गावागावातून शिवस्मारक बांधण्यात येत परंतु काही गावांमध्ये शिवस्मारक बांधतांना बाजारपेठ किंवा रहदारीला अडथळा निर्माण होईल किंवा जीथे शिवस्मारकाचे पावित्र्य सुरक्षित रहाणार नाही अशा ठिकाणी शिवस्मारक बांधण्यात येत असल्याने बऱ्याचशा शिवप्रेमींनी व सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त करत शिवस्मारक हे योग्य ठिकाणी बांधण्यात यावेत अशी मागणी केली आहे. अशीच परिस्थिती वरखेडी येथील ... -
आमदार साहेब शिवस्मारकासोबत शिवराज्य पध्दतीचा अवलंब करावा, तरच खऱ्या अर्थाने शिवस्मारक उभारल्याच सार्थक होईल. संतोष पाटील.
दिनांक~०९/०२/२०२४ आमदार साहेब शिवस्मारकासोबत शिवराज्य पध्दतीचा अवलंब करावा, तरच खऱ्या अर्थाने शिवस्मारक उभारल्याच सार्थक होईल. संतोष पाटील. ———————————————————- तालुक्याचे (पाचोरा) आमदार साहेब गावागावात शिवस्मारक बांधत आहेत या गोष्टीचा प्रत्येक शिवभक्तांना महाराजांच्या मावळ्यांना आनंद झाला, खरं म्हणजे महाराजांच्या स्मारकांची गरज आहे, पण त्यासोबत महाराजांचे विचार आचार समाजामध्ये रुजवण्याची नितांत गरज आहे. शेतकऱ्याच्या भाजीच्या देवालाही हात लागू ... -
शेंदुर्णी ते सुरत चालणाऱ्या ट्रॅव्हल चालकांची हिरो गिरी, रस्त्याने लहान, मोठ्या वाहनांना कट मारण्याचा प्रकार मोठ्या अपघाताची शक्यता.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०२/२०२४ आज रोजी सायंकाळी शेंदुर्णी येथुन सुरतकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकाने मालखेडा ते अंबे वडगाव दरम्यान हिरोगीरी करत दोन दुचाकी स्वरांना तसेच लहान चारचाकी व बैलगाडीला कट मारुन तर कधी गाडी अंगावर आणतोय अश्या पध्दतीने गाडी चालवत मी खुपच भारी ड्रायव्हर असून मी कसे वाहन चालवू शकतो असा देखावा निर्माण केला. या ... -
गरुड महाविद्यालयाच्या गायत्री पाटीलची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०२/२०२४ महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह चॅलेंज या स्पर्धेअंतरगत अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड महाविद्यालय शेंदुर्णी येथील तृतीय वर्ष वाणिज्यची विद्यार्थ्यांनी कुमारी गायत्री सुकलाल पाटील हिला जिल्हास्तरावरील नाविन्यपूर्ण पारितोषिक प्राप्त झालेले आहे. सदर स्पर्धेत उद्योग सुरू करण्यासाठी विजेत्यांना रुपये एक लाखाचे बीज भांडवल दिले जाणार आहे. या विद्यार्थिनीची राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेली ... -
माणुसकी समुहातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांचा सत्कार.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०७/०२/२०२४ पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रजी वाघमारे यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर नासिक येथून नुकतेच बदलून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा आज माणूसकी समुहातर्फे शाळा, श्रीफळ देऊन नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांनी माणूसकी समूहाचे गजानन क्षीरसागर ...