शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयात सहा दिवशीय आत्मनिर्भर युवती अभियान संपन्न.
प्रा. योगिता चौधरी.(शेंदुर्णी)
दिनांक~१८/०२/२०२४
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील अ. र. भा. गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी दिलेल्या मान्यतेनुसार दिनांक ०९ फेब्रुवारी
२०२४ शुक्रवार ते १५ फेब्रुवारी २०२४ गुरुवार या कालावधीत विविध व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष व्याख्यानमालेसाठी पंकज महाविद्यालय चोपडा तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रा. डॉ. संजय पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
या व्याख्यानमालेत युवतींनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगतीस स्वता प्रयत्नशील राहाण्याचे आवाहन केले तसेच विद्यापीठाच्या माध्यमातून राबवलेल्या विविध योजना व या योजनेचा युवतींना होणारा लाभ यासंदर्भात सविस्तर माहिती देत सर्वांगीण विकासाची योग्य दिशा या विषयी प्रा. संजय पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या व्याख्यानमालेचे अध्यक्ष गरुड विद्यालयाचे प्राचार्य प्रा. श्याम साळुंखे यांनी विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग नोंदविला पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. योगिता चौधरी यांनी तर सूत्रसंचालन डॉ. अजिनाथ जीवरग यांनी व डॉ. सुजाता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या सहा दिवसीय व्याख्यानमालेत सौ. उषाताई पाटील, अश्विनी पाटील, पहुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, पुणे येथील श्री. स्वप्नील बंगाली, शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी कु. भाग्यश्री बावस्कर, श्री . दिनेश पाटील, युनियन बॅंक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक श्री. उदय पाटील यांचे विविध विषयांवर मार्गदर्शन लाभले. तसेच युवतींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एच. बी. व सइकलसएल तपासणी करण्यात आली. या व्याख्यानमालेत एकुण ८० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला या व्याख्यानमालेसाठी सर्व शिक्षण, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.