अंबे वडगाव येथील एअरटेल व जिओ टॉवर ठरते शोपीस ठरते आहे शोपीस.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०७/२०२३
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे गावाच्या पश्चिमेला जामनेर, पाचोरा रस्त्यालगत एअरटेल व जिओ कंपनीने टॉवर उभारला आहे. परंतु मागील पंधरा दिवसापासून या दोन्ही कंपनीचे टावरचे नेटवर्क मिळत नसल्याने मोबाईल धारक नागरिक हैराण झाला आहे. विशेष बाब म्हणजे फोन कॉलिंग होते परंतु डेटा नेटवर्क मिळत असल्याने ऑनलाईनची कामे खोळंबली असून शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा नलाईन अभ्यासक्रमात अडथळा निर्माण होत असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे.
तसेच ज्या ग्राहकांनी एअरटेल व जिओचे सिम कार्ड घेऊन दर महिन्याला साडेतीनशे ते चारशे रुपयांचा रिचार्ज केले आहे. परंतु नेटवर्क मिळत नसल्याने अनेक कामांच्या अडथळ्यासह कंपनीकडून मिळणारा दररोजचा दीड ते दोन जी. बी. डेटा कोणताही वापर न करता वाया जात असल्याने संबंधित मोबाईल कंपनीकडून ग्राहकांची एक प्रकारे आर्थिक लूट होत असल्याने मनस्होताप सहन करावा लागत असल्याचा आरोप एअरटेल व जिओच्या ग्राहकांनी केला आहे.