पाचोरा येथील श्री एम. एम. कॉलेज ग्राउंड मैदानावर गोल फेरफटका मारून व्यायाम करण्याची प्रथा न्यारी, एकमेकांशी जुन्या आठवणी काढून जीवनाचा आनंद घेतात भारी.
अनिल आबा येवले.(पाचोरा)
दिनांक~२६/०५/२०२३
पाचोरा येथील श्री एम. एम. कॉलेज ग्राउंड मैदानावर गोल फेरफटका मारून व्यायाम करण्याची प्रथा न्यारी, एकमेकांशी जुन्या आठवणी काढून जीवनाचा आनंद घेतात भारी.
पाचोरा येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी एकत्रित जमून गप्पा मारण्यासाठी व आपले मन मोकळे करण्यासाठी तसेच जुन्या आठवणी व आपले सुखाचे दिवस व दुःखाचा येणारा क्षण यावर चर्चा करण्यासाठी वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांसाठी पाचोरा शहरात माजी आमदार श्री. दिलीप भाऊ वाघ व पाचोरा तालुक्याचे शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. संजय नाना वाघ यांनी वयोवृद्ध लोक तसेच तरुण वर्ग, महिला वर्ग यांना व्यायाम करण्यासाठी तसेच फिरण्यासाठी जागा उपलब्ध करून एक चांगले नियोजन केले आहे. त्यामुळे एम. एम. कॉलेज ग्राउंडवर सर्व स्तरातील व सर्व जातीतील लोक त्या ठिकाणी फेरफटका व गप्पा मारीत असतात या ठिकाणी बऱ्याच वर्षांपासून एकत्रित जमून सकाळी व संध्याकाळी ज्येष्ठ सीनियर सिटीजन इव्हिनिंग ग्रुप पाचोरा येथील एकत्रित जमून आपल्या सर्वांच्या व्यथा व जुन्या दर्दभरी कहाण्या सांगून आनंद व्यक्त करतात. या ग्रुप मध्ये एकूण सोळा सदस्य असून या सोळा सदस्यांचे एकमेकांशी घट्ट नाते असून कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो किंवा कुठेही तीर्थक्षेत्राला जाण्याचा असो किंवा कोणाचा वाढदिवस असो सर्वजण एकमेकाला विचारल्या शिवाय रहात नाही. एकमेकांच्या परिवारामध्ये काही सुख असो किंवा दुःखद घटना असो तर सर्वजण एकमेकाला साथ देत असतात. त्या ग्रुपमध्ये पत्रकार, पोलीस अधिकारी तसेच विविध पदावर असलेले मंडळी असून ते खालील प्रमाणे सिनिअर सिटीझन इव्हिनिंग गृप पाचोरा, येथील महाविद्यालयांच्या मैदानावर – यात दैनिक दिव्य मराठीचे जेष्ठ पत्रकार तथा एल. आय. सी. एजंट श्री. विनायक दिवटे, पोलिस उपनिरीक्षक श्री. रामदास चौधरी, पाचोरा महाविद्यालयाचे प्रभारी सेवानिवृत्त प्राचार्य श्री. एस. एम. पाटील, टेलिफोन अधिकारी श्री. एम. एस. पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक श्री. सुधाकर सुस्ते, श्री. डी. के. पाटील, बेनारचे सेवानिवृत्त अधिकारी श्री. युवराज महाजन, कृषी विभागाचे अधिकारी श्री. बाळकृष्ण भटकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. एस. आर. माने, श्री. बी. बी. (डॅडी) पाटील, श्री. रामकृष्ण सोनवणे, सेवानिवृत्त पोस्ट मास्तर श्री. सुभाष सुर्यवंशी, बी. एस. एन. एल.चे श्री. विलास सदनशिव , अव्वल कारकून श्री. पी. पी. विसावे, एल. आय. सी. एजंट श्री. प्रकाश पाटील, पाचोरा पिपल्स बॅंकेचे शेंदुर्णी शाखेचे व्यवस्थापक श्री. जगन चव्हाण, लाईनमन श्री. बी. जी. गढरी, श्री. निलेश सिनकर यांचा समावेश आहे.
*शब्दांकन*
अनिल आबा येवले
पत्रकार पाचोरा….