खेडगाव नंदीचे येथील शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील रहिवासी असलेले समसुद्दिन रज्जाक पिंजारी नामक शेतकऱ्याने नाही निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातील पिकांचे सततचे झालेले नुकसान तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने गावपरिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर माहिती अशी की मागील दोन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतामधील पिके हातची गेल्याने शेती मशागत तसेच बि,बियाणे व इतर खर्च करुनही हाती पैसा न आल्यामुळे व डोक्यावर कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत असल्याने रोजीरोटीसाठी धडपड करतांना निराश होऊन शेवटी कंटाळून आत्महत्या केल्याची असल्याची माहिती मिळाली आहे,
याबाबत सदर पाचोरा ग्रामीण रुग्णालयाच्या खबरी वरून १२५/२१ सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी पाचोरा पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी हे करत आहेत.