गोंडगाव येथील पिडीत कुंटुबाला जमियत उलमाच्या शिष्टमंडळाकडून सांत्वनपर भेट व आर्थिक मदत.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०८/२०२३
मागील महिन्यात भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील एका सात वर्षीय अजान बालीकेवर लैंगिक अत्याचार करत तिचा खुन करुन तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यातील चाऱ्याच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. या घटनेनंतर गोंडगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी सर्व धर्मिय समाजबांधवांनी निषेध रॅली काढून या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती. याची दखल घेत पाचोरा, भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी काही तासातच या घटनेचा तीव्र निषेध करत विधानसभेत स्व. कल्याणीला न्याय मिळवून देण्यासाठी मागणी केली होती. याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे साहेबांनी तडकाफडकी आदेश काढत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व आरोपी सुटता कामा नये अश्या सुचना दिल्या होत्या. मुख्यमंत्री येथेच थांबले नाहीत तर त्यांनी थेट स्व. कल्याणच्या कुटुंबियांशी भ्रमणध्वनीवर संवाद साधुन त्यांचे सांत्वन करत आरोपीला कठोर शिक्षा देण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे.
ही घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वधर्मीय बांधवांन थेट गोंडगाव येथील स्व. कल्याणच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन मानसिक आधार देत आर्थिक मदत करत आहेत. काल दिनांक २२ ऑगस्ट मंगळवार रोजी पाचोरा येथील जमियत उलमाच्या शिष्टमंडळाने गोंडगाव येथे जाऊन स्व. कल्याणच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन आर्थिक मदत दिली. यावेळी जमियत उलमाचे तालुकाध्यक्ष हाफिज़ जहुर खान, उपाध्यक्ष मौलाना मुख्तार अहमद नदवी, सरचिटणीस अज़ीज़ खाटीक, सामाजिक कार्यकर्ते अझहर खान, आणि कासिम शाह व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अझहर खान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तू हिन्दु बनेगा ना मुसलमान बनेगा
इन्सान की औलाद है इन्सान बनेगा
तू हिन्दु बनेगा ना मुसलमान बनेगा
इन्सान की औलाद है इन्सान बनेगा