बाजार समितीमध्ये सभापती गणेश पाटील यांच्या हस्ते बायोमेट्रिक हजेरीचा शुभारंभ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०६/२०२३
सद्इयस्थितीत लेक्ट्रॉनिक युगात सगळीकडे दिवसेंदिवस प्रगती होत चालली आहे. यातच पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुतन संचालक मंडळाने एक पाऊल पुढे टाकत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी दिनांक २२ जून २०२३ गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात नवीन सभापती मा. श्री. गणेश पाटील यांच्या हस्ते बायोमेट्रिक प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला आहे.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवत नवीन संचालक मंडळाचे सभापती मा. श्री. गणेश पाटील व संचालक मंडळाने पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हितासाठी लहान, सहान कामातून कसा विकास साधता येईल यासाठी प्रयत्न सुरु केले असून बायोमेट्रिक प्रणालीचा शुभारंभ केला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कामावर वेळेवर हजर होऊन बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावावी लागणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेळकाढूपणाला लगाम लागणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीची कामे वेळेवर होण्यासाठी भर पडणार आहे.
या बायोमेट्रिक हजेरी पध्दतीच्या शुभारंभ प्रसंगी प्रसंगी उपसभापती पी. ए. पाटील, संचालक प्रकाश तांबे, संचालक तथा शिवसेना तालुका प्रमुख सुनिल पाटील, राहुल पाटील सचिव बोरुडे यांचेसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कर्मचाऱ्यांनी शेतकरी हितासाठी काम करत बाजार समितीच्या लौकिकात भर घालून समितीच्या भरभराटीसाठी सामूहिक प्रयत्न कारावेत असे आवाहन यावेळी सभापती गणेश पाटील यांनी केले.
*चौकट*
*शुक्रवारी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन* कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा- भडगाव, ग्रामीण रुग्णालय पाचोरा व राष्ट्र विकास मायग्रेंट टी आय संस्था अमळनेर जळगाव(Ngo) यांच्या वतीने रक्त तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
तरी शुक्रवारी सकाळी ११ वाजता कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये नागरिक, हमाल मापाडी यांच्यासाठी रक्त तपासणी शिबिर कॅम्पचे आयोजन केले असून सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन सभापती गणेश पाटील एनजीओ समुपदेशक अमोल सूर्यवंशी यांनी केले आहे.