ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा.गावासाठी जि.प. सदस्य मधुकर भाऊ काटे ठरले भगीरथ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील वरसाडे प्र.पा. येथे एकुण तीन तांडे असल्याने ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करतांना अनेक समस्या निर्माण होत होत्या व पाण्याची टंचाई जाणवत होती. पण अनेक दिवसांपासुन ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जि.प.सदस्य मधुकर काटे याच्यांकडे पाण्याचा प्रश्न सोडवावा म्हणुन मागणी लावुन धरली होती. आणि अखेर जि.प. सदस्य मधुकर काटे यांनी पाठपुरावा करुन ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. येथे जल ही जीवन मिशन या योजने अतंर्गत प्रस्तावाला मान्यता मिळवुन दिलेली आहे. त्यामुळे आता वरसाडे प्र.पा. येथील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे.
सदर प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर ग्रामपंचायत सरपंच सौ. लिलाबाई शिवदास राठोड , उपसरपंच बाबुलाल आनंदा राठोड , ग्रा.सदस्य श्री. बंन्टी राठोड , श्री.पवन पवार , श्री. प्रकाश जाधव , श्री.नितीन चव्हाण , श्री. विनायक राठोड , श्री. बद्री चव्हाण यांनी जि.प.सदस्य मधुकर काटे यांचे आभार मानले. सदर कामी या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले.
१ कोटी २५ लाखाच्या प्रस्तावाला मान्यता
⚫ जल ही जीवन मिशन अतंर्गत शासनाने प्रत्येक घरापर्यंत नळाचे शुध्द पाणी पोहचवण्याचा संकल्प केला आहे.
⚫ या योजने अतंर्गंत वरसाडे प्र पा गावाला पाणीपुरवठा योजना मंजुर झाली असुन ग्रामपंचायतीने १ कोटी २५ लाख रुपयाचा प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे.
⚫ पाणी पुरवठ्यासाठी १ कोटी २५ लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या अनुषगाने आता वरसाडे प्र पा गावातील पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे.