ना सत्तेचा गर्व, ना पदाचा अहंकार, पाचोरा, भडगावच्या आमदारांचा जनसंपर्कासाठी मुक्त संचार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०६/२०२३
सद्यस्थितीत पद, प्रतिष्ठा, पैसा, सत्ता मिळाल्यावर बदलेली माणस पदोपदी बघायला मिळतात किंवा तसा अनुभव येत आहे. सत्ता असली म्हणजे महागडी गाडी, मोबाईल व इतर सुखवस्तू व सोबत लवाजम्यासह स्वताला मिरवून घेत स्वताला चमकवून घेणारी मंडळी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. मग यात राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, यांचा थाटच न्यारा एखाद मोठ पद असल म्हणजे शासकीय वाहन, सोबत पी. ए. पोलीस संरक्षण, जी हुजुर म्हणण्यासाठी सोबतच हाऱ्या, नाऱ्याची जोडी घेऊन लग्न समारंभ, वाढदिवस, विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी एवढच काय एखाद्याच्या अंत्यविधीच्या ठिकाणी म्हसणात सुध्दा काही महाशय पोलीस संरक्षणात येतात कारण काय तर फक्त चमकवून घेण्यासाठी हा खटाटोप असल्याचे लक्षात येते.
परंतु पाचोरा, भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांची गोष्ठच न्यारी दोन वेळा आमदार पदाची सुत्र हाती आल्यापासून त्यांनी स्वताला कधीही आमदार म्हणून स्वताला मिरवून घेतल नाही. कार्यकर्त्यांसाठी व सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी घर, कार्यालय, वेळ, काळ, रात्र, दिवस याच कोणतही बंधन न ठेवता भररस्त्यावर जरी कुणीही गरजू समोर आला किंवा साधा फोन आला तरी लगेचच त्याच क्षणी, त्याच जागेवर संबंधित गरजूंना लवकरात, लवकर मदत करुन त्याची समस्या त्वरित सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी आमदार झाल्यापासून पाचोरा व भडगाव शहरांसह तालुक्यातील गावागावातून आरोग्य सेवा, पाणीपुरवठा योजना, रस्ते, गटारी, व्यायामशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, रस्ते, घरकुल योजना अशा एक ना अनेक योजना राबवून विकास कामांना अधिक प्राधान्य दिले आहे.
दिनांक ०४ जून २०२३ रविवार रोजी निसर्गाने अचानकपणे रुद्र रुप धारण करून वादळीवाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तेव्हा आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी कुणाचीही वाट न पहाता सोबत कोणताही फौजफाटा न घेता विशेष म्हणजे ड्रायव्हरची वाट न पाहता (अकेला चलो) स्वताहून गाडी चालवत पाचोरा, भडगाव तालुक्यातील गावागावात व शेत शिवारात फिरुन नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना भेटून झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. याच पहाणी दौऱ्यात रस्त्यावरुन चालणाऱ्या लोकांना भेटून आपुलकीने विचारपूस करत सर्व परिस्थिती जाणून घेतल्यानंतर झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून शासन दरबारी पाठपुरावा केला आहे.
“आरोग्यसेवेला प्रथम प्राधान्य” (लाव तरे आप्पासले फोन)
पाचोरा, भडगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी प्रथम प्राधान्य देत आजपर्यंत हजारो पिडीतांना आरोग्यसेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या आजारावर आरोग्य शिबिराचे आयोजन करुन मोफत उपचार उपलब्ध करुन दिले आहेत. फक्त उपचारच नव्हे तर प्रत्येक रुग्णाची भेट घेऊन आपुलकीने विचारपूस केली आहे. आजही गाव, खेड्यातील जनतेला कोणतीही अडचण किंवा मदत हवी असल्यास जनतेच्या गरजुंच्या तोंडातून सहज शब्द निघतो तो म्हणजे (लाव तरे आप्पासले फोन).