भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना अंबे वडगाव येथे भावपूर्ण श्रध्दांजली.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०२/२०२२
भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांना अंबे वडगाव ग्रामस्थांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय लतादीदींच्या प्रतिमेचे पूजन करून नंतर दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कायदेतज्ञ मंगेश गायकवाड व संतोष पाटील यांनी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्या काही आठवणी कथन केल्या तसेच रशिद खाटीक यांनी त्यांच्या आवाजातील गित म्हणून श्रध्दांजली लिहीली.
याप्रसंगी हिंमत शिंदे, विनोद शेळके, गजानन चंद्रे, सुनील वाघ, शामकांत वाघ, मुकेश पाटील, कैलास पाटील, समाधान पवार, रामेश्वर राठोड, सुनील निकम, मिलींद भुसारे, अण्णा पाटील, भास्कर गायकवाड, रमेश मराठे, विकास चव्हाण इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.