पाचोरा शहरात पाठ्यपुस्तके व शालेय साहित्य खरेदीसाठी एकच गर्दी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०६/२०२२
यावर्षी १५ जून पासून शाळा उघडल्या असल्याने लहान मुलांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी तसेच जी मुले शिकत आहेत त्यांच्यासाठी पाठ्यपुस्तके, वह्या व शालेय साहित्य खरेदीसाठी शालेय विद्यार्थी व सोबतच पालकांची धावपळ दिसून येत आहे.
खेडेगावातील विद्यार्थी व पालकांची यात जास्तच फरफट होतांना दिसत आहे. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालकांचा व्यवसाय शेती आहे तर चाळीस टक्के पालक हे मोलमजुरी करून आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी धडपड करतांना दिसून येतात. यांची परिस्थिती बेताची असली तरी आपल्या मुलामुलींनी शिकावं मोठ व्हावं ही अपेक्षा असते.
म्हणून पालकवर्ग आपल्या मुलामुलींना शिकवण्यासाठी व विद्यार्थी शिकण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याकरिता पालक व विद्यार्थी पाठ्यपुस्तके, वह्या व इतर साहित्य खरेदीसाठी सरसावले असल्याने पाचोरा शहरासह लहान मोठ्या गावात पुस्तकालय (बुक स्टॉल) तसेच जनरल स्टोअर्स मध्ये एकच गर्दी दिसून येत आहे.