पाचोर्यात तीन मजली इमारत कोसळली, सुदैवाने जीवीत हानी नाही.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०९/२०२१
बांधकाम करतांना काही तांत्रिक दोष राहील्याने गेल्या पाच वर्षापूर्वी पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात बांधण्यात आलेली तीन मजली इमारत काल रात्री अचानक कोसळली सुदैवाने यात जीवीत हानी झाली नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की व्ही.पी.रोड वरील मुंबई निवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी पाच वर्षापूर्वी पाचोरा येथे इन्व्हेस्टमेंट म्हणुन तीन मजली इमारतीचे बांधकाम केले होते. मात्र सततच्या पावसाने व सदोष बांधकामामुळे या इमारतीला तडा गेला होता. म्हणून या इमारतीत रहात असलेले भाडेकरू यांनी धोका ओळखून ही इमारत वेळीच रिकामी केली होती.
कधी रिमझिम तर जोरदार होणाऱ्या सततच्या पावसाने दिनांक २० सप्टेंबर सोमवारी रात्री अंदाजे १० वाजेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली परंतु यापूर्वीच नगरपरिषदेने हा रस्ता अगोदरच बंद केला असल्याने सुदैवाने यात जीवीत हानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यात कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मा.श्री. सचिन सोमवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सत्य परिस्थिती जाणून घेतली. परीसरातील आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतल्याने सुदैवाने जीवीत हानी झाली नाही व पुढील अनर्थ टळला.
तसेच इमारत कोसळली तेव्हा आसपासच्या लोकांनी हे दृश्य पाहिले जणू एखाद्या चित्रपटात दाखवले जाते असा तो प्रसंग होता या ठिकाणी हजर असलेल्या एका व्यक्तीने इमारत पडत असतांनाचा व्हिडिओ काढला आहे. सोशल मीडिया वर जोरात व्हायरल होत आहे.