निकृष्ट कामाची बातमी लावल्याचा राग मनात धरून अमळनेर येथील नगरसेवकाची पत्रकाराला जीवे ठार मारण्याची धमकी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०६/२०२२
सद्यस्थितीत सत्ताधारी मग तो ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका किंवा आमदार, खासदार असो यापैकी बरेचसे पदाधिकारी हे जनहिताच्या गप्पा मारत निवडून येतात. परंतु एकदा की निवडून आले म्हणजे ते स्वहिताच्या मागे लागतात. मग स्वतांच चांगभलं करुन घेण्यासाठी जनहिताच्या माध्यमातून विविध विकास कामांचा आव आणून विकासकामे आणतात. मात्र या विकासकांच्या माध्यमातून भरघोस कमिशन खातात मग होणारी कामे कशीही झाली तरी चालतील फक्त आणि फक्त मलिदा खाण्यासाठी हे मनमानी कारभार करुन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात. हे करत असतांनाच कायदा व सत्ता आमच्याच बापाची समजून ते करत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत कुणीही आवाज उठवल्यानंतर त्याचे तोंड बंद करण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करुन दमदाटी, जिवे मारण्याच्या धमक्या देऊन स्वताचे पाप झाकण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करतात.
असाच एक प्रकार अमळनेर येथील पत्रकार तथा दिव्य लोकतंत्र पोर्टल न्यूजचे संपादक समाधान मैराळे यांच्या बाबतीत घडला आहे. यांनी अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून या प्रभागातील निकृष्ट दर्जाच्या कामांसादर्भात बातमी प्रसिद्ध केली होती. ही बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून प्रभाग क्रमांक चे नगरसेवक संतोष पाटील उर्फ (भुरा आप्पा) यांनी पत्रकार समाधान मैराळे यांना फोन करुन खोटा गुन्हा दाखल करून अडकवून टाकू. आणि जर बातम्या थांबवल्या नाहीत तर जीवे ठार मारू अशी धमकी दिली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, दिव्य लोकतंत्र ऑनलाइन न्युज पोर्टलचे संपादक समाधान मैराळे यांनी गेल्या काही दिवसांपासून शहरातील निकृष्ट कामांसंदर्भात बातम्या प्रकाशित केल्या होत्या. त्याच प्रकारे अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील साने नगर भागातील देखील बातम्या प्रसिद्ध केल्या. याचा संबंधित नगरसेवकाला राग आल्याने त्याने पत्रकार मैराळेंना फोन करून अरेरावीची भाषा करत खोटा गुन्हा दाखल करून अडकवून देऊ अशी धमकी दिली. तर बातम्या थांबवल्या नाहीत तर जीवे ठार मारू अशीही धमकी दिली होती. याच बाबत आज अमळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान संबंधित नगरसेवकावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असून धमकी देणारे नगरसेवक संतोष पाटील उर्फ (सुरा आप्पा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन पत्रकार समाधान मैराळे यांना न्याय मिळावा याकरिता पाचोरा शहरातील सर्व पत्रकार पाचोरा येथील पोलिस ठाण्यात निवेदन देणार असून या धमकी देणाऱ्या नगरसेवकांचा तिव्र शब्दात निषेध केला आहे.