कै.परशराम कोंडीबा शिंदे बहुउद्देशीय मंडळ व भाजपा युवामोर्चा पाचोरा यांच्या माध्यमातून, १० वी च्या विद्यार्थ्यांकरिता मोफत समर व्हॅकेशन क्लासेस.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०४/२२२
कै.परशराम कोंडीबा शिंदे बहुउद्देशीय मंडळ व भाजपा युवामोर्चा पाचोरा यांच्या माध्यमातून, १० वी च्या विद्यार्थ्यांकरिता मोफत समर व्हॅकेशन क्लासेस.
पाचोरा येथील सामाजिक क्षेत्रात नेहमी लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेली संस्था कै. परशराम कोंडीबा शिंदे बहुउद्देशीय मंडळ व भाजपा युवा मोर्चा पाचोरा यांच्या संयुक्त माध्यमातून कृ. उ.ज्ञबा. समितीचे मा. सभापती मा. श्री. सतीषबापु शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा तालुकाध्यक्ष मा. श्री. अमोलभाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता मोफत समर व्हॅकेशन क्लासेसचे आयोजन करण्यात आले आहे.
सालाबादाप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दरवर्षी नववीची परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना आगामी दहावी अभ्यासक्रमाच्या तयारी साठी हे मोफत समर व्हेकेशन क्लासेसचे आयोजन केले जाते. परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीचे संपूर्ण जगावर सावट असल्याने व त्यामुळे शाळा व क्लासेस पूर्णपणे बंद असल्याने सदर क्लासेस घेणे आयोजकांना शक्य झाले नव्हते. परंतु या वर्षी पुन्हा एकदा दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत व पाचोरा तालुक्यातील विद्यार्थ्यांना या क्लासेसचा मोफत लाभ कसा घेता येईल याचे नियोजन करून सतिषबापु शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोलभाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून कै.परशराम कोंडीबा शिंदे बहुउद्देशीय मंडळ पाचोरा व भाजपा युवा मोर्चा पाचोरा यांच्या माध्यमातून या मोफत समर व्हॅकेशन क्लासेसचे आयोजन करण्यात आले आहे.
या क्लासेसची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
१)अनुभवी व तज्ञ शिक्षक वर्ग
२)व्यक्तिगत मार्गदर्शनावर भर
३)प्रत्येक विषयाचे सखोल मार्गदर्शन
४)हमखास यशाची खात्री
५) दररोज ३ तास टीचिंग
६) ६० विद्यार्थ्यांची स्वतंत्र बॅच
७) सेमी व मराठी दोन्ही माध्यम
८) दररोज ५ तास तासिका
तरी आपला प्रवेश आजच निश्चित करण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर आपले संपूर्ण नाव,मोबाईल नंबर,पत्ता,माध्यम, शाळेचे नाव पाठवावे
९३५९००९५९०
८०८०९८९०४६
तसेच सदर समर व्हॅकेशन क्लासेस ०२ मे २०२२ ते १० जून २०२२ पर्यंत कै. पि. के. शिंदे माध्यमिक विद्यालय, विवेकानंद नगर, पाचोरा येथे सुरू करण्यात येणार आहेत. तरी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या मोफत समर व्हेकेशन क्लासचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, सरचिटणीस परेश पाटील, योगेश ठाकूर, खेडकर, नितुनाना पाटील, यांच्यासह भाजपा युवामोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.