शेंदूर्णी येथील गरुड महाविद्यालयाला माजी विद्यार्थ्यांनी दिली स्नेह भेट.
प्रा. डॉ. योगिता ताई चौधरी.(शेंदुर्णी)
दिनांक~०३/०४/२०२३
जामनेर तालुक्यातील शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेंदुर्णी येथील आप्पासाहेब रघुनाथराव गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाला सन २०१० यावर्षीच्या माजी विद्यार्थ्यांनी नुकतीच भेट देऊन सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या गुरुजनांना स्वताचा परिचय करुन देत याच विद्यालयात शिक्षण घेत असतांनाच्या विद्यालयीन काळातील घडामोडी, गुरु, शिष्यातील असलेले अतुट व जिव्हाळ्याच्या स्मृतींना उजाळा दिला. तसेच तसेच आम्ही या विद्यालयात शिकत असतांनाच गुरुजनांनी आम्हाला शिकवतांनी जी मेहनत घेतली म्हणून आम्ही चांगल्याप्रकारे शिक्षण घेऊन आज कुठेतरी स्वताच्या पायावर उभे आहोत असे सांगून तुम्ही पण आमच्यासाखेच शिक्षण घेऊन पुढे जाल अशी अपेक्षा विद्यार्थ्यांजवळ व्यक्त केली.
उपप्राचार्य मा. श्री. संजय भोळे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना माजी विद्यार्थी हे महाविद्यालयाचे वैभव असतात असे सांगत जे, जे विद्यार्थी येथून शिक्षण घेऊन पुढे गेलेले असतात त्यांची प्रगती पाहूनच पालक आपल्या पाल्यांना आमच्या संस्थेत शिक्षण घेण्यासाठी पाठवतात हेच उदाहरण आमच्या संस्थेच्या शैक्षणिक दर्जाचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले.
याप्रसंगी प्रास्ताविक करतांना माजी विद्यार्थी संघाच्या समन्वयक डॉ. योगिता चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना त्यांच्या काळातील महाविद्यालय आणि आज महाविद्यालयाचा झालेला विकास याबद्दल माहिती देत माजी विद्यार्थ्यांची महाविद्यालया प्रति असलेली जबाबदारी प्रतीत केली. तसेच प्राचार्य प्राध्यापक श्याम साळुंखे यांनी महाविद्यालयाचा प्रगतीचा आलेख विद्यार्थ्यांसमोर ठेवला. माजी विद्यार्थी संघाचे सचिव श्री.हितेंद्रकुमार गरुड यांनी नोंदणीकृत असलेल्या आचार्य माजी विद्यार्थी संघाची मागील पाच वर्षाची कामगिरी विद्यार्थ्यांना सांगितली तदनंतर याच पद्धतीने भविष्यातही जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधत वेगवेगळ्या माध्यमातून महाविद्यालयाशी जूळून राहण्याचे आवाहन करीत माजी विद्यार्थी संघाचे सहसचिव अमर जावळे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास छत्रपती संभाजी नगर, दिल्ली, धुळे, जळगाव सोयगाव या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात कार्य करत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. कार्यक्रम प्रसंगी डॉ. दिनेश पाटील डॉ. महेश पाटील, प्रा. आप्पा महाजन, प्रा. प्रमोद सोनवणे, डॉ. अजिनाथ जीवरग आणि इतर प्राध्यापक बंधू भगिनी यांनी हजेरी लावली.