पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले अरुण राजपूत यांना प्रसारमाध्यमांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०३/२०२२
पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला मागील गेल्या काही वर्षापी गोपनीय शाखेची धुरा सांभाळणारे तसेच पिंपळगाव हरेश्वर गाव व परिसरातील सामाजिक, राजकीय, धार्मिक व इतर कार्यक्रम व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक व्यक्ती विषयी व्यक्तिगत माहिती असलेले आमचे सर्वांचे लाडके मा.श्री. अरुण दादा राजपूत यांना वाढदिवसानिमित्त खुप, खुप शुभेच्छा.
पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे मनमिळावू स्वभावाचे सर्वांशी गोड बोलणारे, वरिष्ठ अधिकार्यांचा मानसन्मान करणारे, कुठल्याही विभागातील काम असले तरी तत्परतेने सोडवण्यासाठी प्रयत्न करणारे, कधीही कोणाचे मन न दुखवता गोड बोलून सर्वांची काम करून देणारे, मोर्चा, आंदोलन, उपोषण, यासंदर्भात सर्वांशी चर्चा करून वरिष्ठांना त्यांची सत्य परिस्थिती कळवून प्रश्न सोडवून मार्गी लावणारे श्री. अरुण दादा राजपूत म्हणजे पोलिस खात्यातील दमदार व्यक्तिमत्व साधा स्वभाव, सतत हसतमुख गावातील सर्व पक्षांची व सर्व संघटना सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी चांगले संबंध जपून पोलीस खात्याची शान असलेले असे श्री.अरुण दादा यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने आदरपूर्वक दोन शब्द व वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
दिपक मुलमुले. (पत्रकार) पिंपळगाव हरेश्वर.