सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›धक्कादायक:आधी पत्नीला जीवे ठार मारुन नंतर स्वताः घेतला गळफास. पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील घटना.

धक्कादायक:आधी पत्नीला जीवे ठार मारुन नंतर स्वताः घेतला गळफास. पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील घटना.

By Satyajeet News
October 29, 2021
457
0
Share:
Post Views: 59
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/१०/२०२१

पाचोरा तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पत्नीचा गळा आवळून ठार केल्यानंतर स्वतः झाडाला पँटने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सतिष धनसिंग परदेशी (वय–३८) आणि गायत्री सतिष परदेशी (वय–३२) असे मृत दांपत्याची नावे असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत असे कि दिनांक २८ गुरुवार रोजी रात्री सतिष परदेशी व त्यांची पत्नी गायत्री परदेशी, ६ वर्षाचा मुलगा व ४ वर्षाच्या मुलीसह संपूर्ण कुटुंब निद्रावस्थेत झोपी गेल्यानंतर शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान सतिष धनसिंग परदेशी याने गाढ झोपेत असलेली त्याची पत्नी गायत्री सतिष परदेशी हिचा दोन्ही हाताने गळा आवळून तीला ठार केले.

त्यांनंतर सतिष परदेशी याने गावाबाहेर पळत जाऊन येथील माजी सरपंच गोकुळसिंग नथ्थुसिंग परदेशी यांच्या शेतात गेल्यानंतर पळसाच्या झाडावर चढत अंगात असलेल्या स्वेटर व नाईट पँटचे दोन तुकडे करून गळ्याभोवती आवळून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.

सकाळी घडलेल्या या प्रकारची वार्ता गावभर वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सतिष याचा शोध सुरू झाला. दरम्यान गावातीलच संजय धना सोनवणे हे सकाळी ९ वाजेच्या दरम्यान स्वतःच्या शेतात जात असतांना त्यांना पळसाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सतिष धनसिंग परदेशी याचा मृतदेह आढळून आल्याने त्याने गावात पळत जाऊन घटनेची माहिती दिली.

दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार पत्नीस ठार करून स्वतः गळफास घेणारा इसम काही प्रमाणात वेडसर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये, सहायक फौजदार विजय माळी, हवालदार दिपकसिंग पाटील, संदिप राजपूत, वाहनचालक दिपक अहिरे यांनी पंचनामा केला. मयत पती व पत्नी यांचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा येथे आ.तांबेच्या उपस्थितीत कॉंग्रेसची आढावा बैठक ...

Next Article

शेंदुर्णी नगरपंचायत सफाई कर्मचारी संपावर, नागरिकांचे आरोग्य ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    पहुर पोलीसांची पाळधी शिवारातील दारुच्या अड्ड्यावर धाड, बाराशे लीटर रसायन व साधनसामग्री केली नष्ट.

    April 10, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    सत्यजीत न्यूजला बातमी येताच कुऱ्हाड येथील बसस्थानक परिसरात शुकशुकाट. मात्र कारवाई शुन्य.

    January 8, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना २४ तासात अटक, जिल्हाधिकाऱ्यांचे कडक कारवाईचे आदेश.

    December 20, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कुऱ्हाड येथे जुगार अड्ड्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई, ग्रामस्थांनी मानले आभार.

    October 31, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पाचोरा ते शेंदुर्णी रस्त्यावर अवैध वाहतूक बोकाळली.

    November 10, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    केबल वायर चोरी प्रकरणातील तीन आरोपी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांच्या ताब्यात, न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलिस कस्टडी

    February 24, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • राष्ट्रीय

    अजानच्या भोंग्यांबाबत उच्च न्यायालयाने दिला हा महत्वपूर्ण निकाल.

  • फोटो क्लीप

    पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सावलीच भुत आणि अफवांना ऊत.

  • शैक्षणिक

    एस.टी. सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पायपीट.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज