पाचोरा येथे आ.तांबेच्या उपस्थितीत कॉंग्रेसची आढावा बैठक संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/१०/२०२१
पाचोरा येथे आमदार तांबे यांच्या अध्यक्षतेखाली व तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉंग्रेसची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली या आढावा बैठकीत कॉंग्रेसच्या पुढील वाटचालीसाठी सखोल चर्चा करुन पुढील दिशा ठरविण्यात आली.
या बैठकीत सुरवातीला आमदार तांबे यांनी कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्ते सह पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत ओळख करून घेत समस्या जाणून घेतल्या तदनंतर पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यातील परिस्थिती जाणून घेत कॉंग्रेस पक्षाचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी काळात पक्षाच्या संघटनावर भर देत संघटन मजबूत कसे करता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यात काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या काळात आरोग्य समस्या, प्रशासकीय समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना व गावागावातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करुन ते मजबूत करण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. आमदार तांबे यांनी पाचोरा येथे भेट देऊन कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून आपुलकीने विचारपूस केल्यामुळे कार्यकर्त्यांची मरगळ झटकून निघत त्यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी सांगितले.
यावेळी बैठकीत तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, पंचायत समितीचे माजी सभापती शेख इस्माईल शेख फकीरा, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गिरी, राजेंद्र महाजन,प्रा. एस. डी. पाटील, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक,शहर अध्यक्ष शरीफ शेख, महिला जिल्हा सरचिटणीस कुसुमताई पाटील, संगीता नेवे, तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार,कल्पना निंबाळकर, प्रकाश चव्हाण, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे,युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, शिवराम पाटील, प्रदीप पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.