शेंदुर्णी नगरपंचायत सफाई कर्मचारी संपावर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

दिलीप जैन.(शेंदूर्णी)
दिनांक~३०/१०/२०२१
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी आरोग्य सफाई कर्मचारी मागील दोन दिवसापासून बेमुदत उपोषणावर बसले असून त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा इशारा कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
किमान वेतन व विशेष भत्याप्रमाणे पगारवाढ मिळावी, शासन नियमाप्रमाणे किमान वेतन व विशेष भत्ता मेळावा, शासन निर्णयाप्रमाणे शासकीय सुट्टी २७ सप्टेंबर २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे सर्व कायम सफाई कामगारांना शासकीय सुट्या मिळाव्यात, प्रत्येक महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार वार रविवार रोजी सुट्टी मिळावी, सफाई कर्मचाऱ्यांना गणवेश शिलाई भत्ता व त्याप्रमाणे कामाचे साहित्य तसेच ओळखपत्र मिळावे, भूतकालीन ग्रामपंचायत कायमस्वरूपी कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम अद्याप पर्यंत मिळालेले नसून ती त्वरित मिळावी, या मागण्यांसाठी सफाई कर्मचारीवर्ग नगरपंचायतीच्या समोरच्या प्रांगणात मंडप टाकून उपोषणाला बसले आहेत.
दिवाळीच्या पूर्व सप्ताहात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उपोषण यामुळे आरोग्याच्या समस्या वाढतील का? अशा नागरिकांमध्ये चिंतेची चर्चा करतांना दिसत आहे सुनिता उसे शोभाबाई ऊसे रंजना निकम लक्ष्मीबाई जावळे रेखा वाघ श्यामा बाई वाघ मायाबाई जावळे सुलोचना जावळे आशाबाई भालेराव मिनाबाई निकम कल्पना निकम छाया निकम सीमा निकम मिनाबाई निकम आम्रपाली निकम आदी कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वाक्षरीसह दिनांक २० रोजी उपोषणाचा इशारा देऊनही नगरपंचायतीच्या वतीने आठ दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या पगारवाढ विनंती अर्जाचा विचार न झाल्याने नाइलाजास्तव आजपासून आम्हाला बेमुदत उपोषणावर बसण्यास प्रशासनामुळे वेळ आली अशी प्रतिक्रिया उपोषण करणारे सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.