नवऱ्याने केला विश्वासघात, बायको पोहचली पोलीस स्टेशनात. विवाहबाह्य अनैतिक संबंधांमुळे अनेक संसाराची राखरांगोळी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०७/२०२३
एका बाजूला भारतीय संस्कृतीत पतीला परमेश्वर मानून आपल उभ आयुष्य त्याच्या सोबत राहुल जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वटसावित्री पौर्णिमा व इतर व्रत उपवास करणाऱ्या माता, भगिनी तर दुसरीकडे सद्यस्थितीत सगळीकडे स्वैराचारी वृत्ती दिसून येत आहे. मुली पळून जाणे, मुली पळवून आणणे, विनयभंग, बलात्कार, अनैतिक संबंध, विवाहित महिलांचे पळून जाणे किंवा परपुरुषांशी अनैतिक संबंध ठेवणे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. असाच काहीसा प्रकार काल पाचोरा शहरालगत पाचोरा ते जामनेर रस्त्यावर असलेल्या रविराज परमिट रूम, बिअर, बार येथील राधा, किशन लॉजवर उघडकीस आला असून एका महिलेने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडून पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा येथील संघवी कॉलनी परिसरातील एक २७ वर्षीय महिला खाजगी नोकरी करुन आपल्या घराचा उदरनिर्वाह चालवते. तसेच पतीही कामधंदा करतात परंतु आपल्या पतीचे बाहेर कुठेतरी अनैतिक संबंध आहेत असा संशय असल्याने संबंधित महिला आपल्या पतीवर पाळत ठेवून होती. याच दरम्यान काल दिनांक ०१ जुलै २०२३ शनिवार रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आपला पती दुसऱ्या महिलेसोबत पाचोरा ते जामनेर रस्त्यावर असलेल्या रविराज परमिट रूम, बिअर, बार येथील राधा किशन लॉजवर असल्याची माहिती मिळताच संबंधित महिलेने आपल्या एका नातेवाईकाला सोबत घेत थेट रविराज हॉटेलवर जाऊन रंगेहाथ पकडले व पाचोरा पोलीसांच्या हवाली करत रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी राहुल रविंद्र देसले याच्या विरोधात भा. द. वि. कलम ४९७ प्रमाणे रीतसर गुन्हा नोंद करुन घेत संबंधित तक्रारदार महिला व संबंधित आरोपी नात्याने पतीपत्नी असल्याकारणाने त्यांना न्याय मिळवून घेण्यासाठी न्यायालयात जाण्याची समज दिली असल्याची माहिती समोर येत आहे.
*******************************************************
रविराज परमिट रुम, बिअर, बार व राधा किशन लॉजवर काल हा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच या रविराज परमिट रुम, बिअर, बार हॉटेल व राधा किशन लॉज बद्दल जनमानसातून तसेच आसपासच्या शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून बिअर, बार, परमिट रुम हे नावालाच असून याठिकाणी दिवसभर फक्त आणि फक्त स्री, पुरुष येतात आणि जातात तसेच याठिकाणी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे नावालाच असून हे बसवलेले सी. सी. टी. व्ही. कॅमेरे सोयीनुसार बंद, चालू केले जातात अशी जोरदार चर्चा सुरु आहे.
*******************************************************
आजच्या घडीला नियमानुसार एक सज्ञान महिला म्हणजे १८ वर्षांपेक्षा वयाने मोठी व एक सज्ञान पुरुष म्हणजे २२ वर्षांपेक्षा वयाने मोठा आपापल्या मर्जीप्रमाणे एकमेकांसोबत हिंडू फिरु शकतात. याचाच फायदा घेत सगळीकडे स्वैराचारी वृत्ती वाढीस लागली असून वरील प्रमाणे गैरप्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. व याचाच फायदा घेत काही लॉजिंग व्यवसायिकांची चांदी होत आहे. असे असले तरी संबंधित लॉजिंग व्यवसायिकांने आपल्या लॉजवर येणाऱ्या प्रत्येक स्त्री व पुरुषांची नोंद ठेवणे, दोघेही सज्ञान आहेत की नाही याकरिता आधार कार्ड किंवा अन्य पुरावा पाहुनच त्यांना लॉजवर थांबण्यासाठी मुभा दिली पाहिजे.
परंतु बरेचसे लॉजिंग मालक हे नियम पायंदळी तुडवत कमी वेळात जास्त पैसा कमावण्यासाठी या नियमावलीकडे जाणून, बुजून दुर्लक्ष करत असल्याने काही आंबट शौकीन व काही धनदांडगे पैशाच्या जोरावर व दलालांमार्फत अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून अशा लॉजिंगवर आणून त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करत आहेत. तसेच अल्पवयीन तरुणी व तरुणांना अशा लॉजिंग सुरक्षित ठिकाण वाटत असल्याने ते बिनधास्तपणे या ठिकाणांचा वापर करत असल्याचे दिसून येत व यातुनच अल्पवयीन मुले, मुली पळून जाणे, एकत्र येत आत्महत्या करणे, कुमारी माता बनने असे प्रकार वाढत असून भविष्यात ही मोठी समस्या निर्माण होणार आहे.
म्हणून प्रत्येक लॉजवर चौफेर सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसवण्यात यावेत, लॉजवर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची आधार कार्ड किंवा अन्य योग्य त्या पुराव्यानिशी वयाची खात्री करुन आलेल्या ग्राहकांची नोंद करणे हे सक्तीचे केले पाहिजे म्हणजे तसेच पोलीसांनी प्रत्येक महिन्याला एकवेळ लॉजवर जाऊन तपासणी करणे (कंम्बो रेड) करणे क्रमप्राप्त आहे मात्र सद्यस्थितीत अशी तपासणी व कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. म्हणून या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले तर असे गैरप्रकार थांबतील असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.