वरखेडी येथील गुरांचा बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद , पशुधन पालक व व्यापाऱ्याकडून सहकार्याची आपेक्षा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/१०/२०२१
लम्पी स्कीन या आजाराने डोके वर काढले असून याची दखल घेत जनावरांच्या लम्पी आजाराची संसर्गकेंद्रे माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडून घोषित करण्यात आली असून त्याबाबत सजग रहाण्याच्या सुचना जिल्हाधिकारी मा.श्री.अभिजित राऊत साहेबांनी दिल्या आहेत.
यात जळगाव, चाळीसगाव तालुक्यातील मौजे वाकडी, पाचोरा तालुक्यातील नांद्रा, पिंपरखेड, वरखेड, भडगाव तालुक्यातील पिर्चेडे या ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी या त्वचेच्या साथ रोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला असल्याने या रोगाचा प्रसार जिल्ह्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे चाळीसगाव, पाचोरा, भडगाव तालुक्यातील या चार संसर्गकेंद्रापासून १० कि.मी बाधित क्षेत्र म्हणून घोषित केल्याचे आदेश जिल्हाधिकारी मा.श्री.अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
म्हणून लम्पी या त्वचेच्या आजाराच्या संसर्गाच्या अनुषंगाने बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जतुकीकरण करुन १० कि.मी परिघातील परिसरात जनावरांची खरेदी-विक्री, वाहतुक, बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यासही कडक प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
याची दखल घेत पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे दर गुरुवारी भरणारा गुरांचा बाजार पुढील सुचना येईपर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले असून पशुधन पालकांनी आपली गुरेढोरे बाजारात विक्रीसाठी आणू नये, तसेच पशुधन व्यापाऱ्यांनी सुध्दा या सूचनांचे काटेकोर पालन करून जनावरे खरेदी, विक्रीसाठी येऊ नये अशी विनंती पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करण्यात आली आहे.