आंबे वडगाव येथील तरुणाचा, ट्रॅक्टर अपघातात मृत्यू.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/११/२०२१
आंबे वडगाव येथील आकाश शांताराम सोनवणे वय २५ याचे ट्रॅक्टर अपघातात नुकतेच निधन झाले आहे. या घटनेमुळे आंबेवडगाव गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आकाश शांताराम सोनवणे हा आंबेवडगाव येथीलच एका इसमाचे ट्रॅक्टरवर कामासाठी गेला असताना मंगळवार रात्री ११ ते बुधवार १२ वाजेच्या दरम्यान वाळू वाहतूक करतांना ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने अपघात होऊन या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आकाशा सोनवणे परिवारातील करता व कमावता मुलगा असल्याने आज रोजी हे कुटुंब उघड्यावर आले आहे. विशेष म्हणजे आकाश हा काम करून शिक्षण घेत होता. भविष्यात कुठेतरी नोकरी लागेल या अपेक्षेने तो पोलिस किंवा सैन्य भरतीत जाण्यासाठी दररोज व्यायाम, रनिंग व अभ्यास करत होता. दिवसा काम व रात्री अभ्यास करणारा होतकरू मुलगा यांचे अपघाती निधन झाल्याने गाव परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.