शेतकऱ्यांच्या नुकसानीची पहाणी करतांना, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या डोळ्यात आले पाणी.
सत्यजीत न्यूज(घोसला)
दिनांक~०५/२०२१
मागील आठवडाभरात महाराष्ट्रात सर्वदूर तसेच सोयगाव तालुक्यात ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके उध्वस्त झाली, काही तासातच होत्याचे नव्हते झाले. (मामाच्या वाड्यात शंभर गायी, पहाटे पाहिले तर एकही नाही) अशी गत झाली आहे.
या अतिवृष्टीचा फटका सोयगाव सह तालुक्यातील घोसला ,निमखेडी ,उमर वीरा ,तिडका ,बनोटी ,वरठाण, आदी भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काळ,वेळ न पहाता तातडीने रात्रीच्या अंधारात वरील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतली. रात्रीची वेळ असल्याने शेतात जाणे शक्य नसल्याने बऱ्याशा शेतकऱ्यांनी आपपल्या मोबाईल मध्ये काढलेले फोटो दाखवत आपली आपबिती कथन केली.
शेतकरी आपल्या शेतातील मालाचे झालेले नुकसान सांगताना काही शेतकऱ्यांना रडायला आले होते. हा क्षण ईतका नाजूक होता म्हणून शेतकऱ्यांची हळहळ पाहून माजी खासदार चंद्रकांत खैरे इतके भावूक झाले व त्यांचेही डोळे पाणावले तसेच मी शासन दरबारी पाठपुरावा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नक्कीच नुकसानीची भरपाई मिळवून देईल राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीचा नुकसानीची सरसकट पंचनामे करून शंभर टक्के नुकसानीची मदत देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांचे मनोबल वाढले असून मदतीच्या आशेवर शेतकरी बसला आहे.
यावेळी आमदार उदय सिंग राजपूत उपजिल्हाप्रमुख अवचित नाना आवळे, तालुकाप्रमुख केतन काजे, सोयगाव तालुका संघटक दिलीप भाऊ मचे, सोयगाव शहराध्यक्ष गजानन पाटील, कन्नड तालुका संघटक अण्णासाहेब शिंदे, विष्णू माळी तसेच घोसला येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.