जागतिक महिला दिनानिमित्त योग व आरोग्य शिबिर संपन्न.

डॉ. योगिता ताई चौधरी.
दिनांक~१४/०३/२०२३

केशराईरी हॉल जळगांव आणि के. के. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ योगा नॅचरोपॅथी आणि रिसर्च जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १२ मार्च २०२३ रविवार रोजी, दुपारी २ ते ६ या वेळात श्री, उत्तम आहिरे यांनी या आरोग्य आणि समुपदेशन शिबिराचे आयोजन केले होते.

हे शिबिर आयोजित करण्यामागचा हेतू असा होता की सद्यस्थितीत धावपळीच्या जीवनात वेळेवर आहार न घेणे, स्वयंपाकाला वेळ नसल्याने किंवा जीभेचे चोचले पुरवण्यासाठी फास्ट फूड घेणे, आहारात दिवसेंदिवस होणारा बदल व कृत्रिमता तसेच व्यायामाकडे व योगासनांकडे दुर्लक्ष यामुळे उद्भवणाऱ्या शारीरिक व्याधी यांच्यापासून स्वताचा बचाव कसा सोडवायचा याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात आरोग्याविषयी उद्भवणाऱ्या विविध व्याधी व विकारांवर येणाऱ्या अडचणींवर निसर्गोपचार पद्धती व योग साधनेने कश्या पद्धतीने सोडवता येतील यासंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली. तसेच निसर्गोपचार व योगयुक्त निरोगी जीवनशैलीचा प्रसार व प्रचारासाठी आय. एन. ओ. च्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी माती चिकित्सा कशी असते हे पटवून देत माती पावडर याचे महत्त्व पटवून दिले. तसेच आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे केले जात असल्यामुळे अंकुरित तृणधान्याचे महत्व पटवून देत उपस्थित महिलांना अंकुरित हिरव्या मुगाचे वाटप करण्यात आले.

या शिबिरात प्रमुख व्याख्याता म्हणून महाराष्ट्र योग असोसिएशन, जिजामाता विद्यालयाच्या अध्यक्षा क्रीडा शिक्षिका डॉ. अनिता पाटील सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. किशोर पाटील सर, मनोज वाणी, प्रविण पाटील, मयुर पाटील, सतीष पाटील, डॉ. माधुरी कासट व इतर मान्यवर उपस्थित होते.