वरसाडे येथील सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी राठोड कुटुंबियांवर केला प्राणघातक हल्ला, महिलेसह दोन जखमी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०९/२०२१
पाचोरा तालुक्यातील वरसाडे येथील एका तरुणाने मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज या वेबसाईट वरून वरसाडे तांडा नंबर १ या गावासाठी विविध योजनेतून आलेल्या निधीची माहिती काढून ती (व्हाट्सअपच्या) सोशल मीडियाच्या माध्यमातून वरसाडे तांडाच्या ग्रुप वर माहिती टाकली होती. व आता तरी विकास कामे होऊन गाव प्रगतीपथावर येऊ द्या असा हेतू डोळ्यासमोर ठेवून कामांना सुरुवात करा व निधीचा योग्य वापर करा असे आवाहन केले होते.
परंतु या संदेशाचा गैरसमज करून सत्ताधारी सरपंच सौ.लिलाबाई शिवदास राठोड व त्यांचे पती शिवदास भुरा राठोड यांनी आज सायंकाळी ५.३० मिनिटे ते ६ वाजे दरम्यान त्यांच्या ४० ते ५० समर्थकांना सोबत घेत थेट विजयसिंह धर्मा राठोड यांच्या घरावर हल्ला चढवत रामकृष्ण राठोड यांच्या मालकीचे एक्वा फिल्टर प्लांट वर हल्ला चढवून प्लांटची तोडफोड केली. तसेच घरात घुसून रामकृष्ण विजय सिंग राठोड व यांची पत्नी आशाबाई रामकृष्ण राठोड व घरातील इतर सदस्यांना बेदम मारहाण केली यात रामकृष्ण विजयसिंग राठोड व सौ.आशाबाई रामकृष्ण राठोड जबर जखमी झाले असून सौ.आशाबाई हिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व मणी तसेच इतर किमती वस्तू गहाळ झाल्या आहेत. त्यांनी कसातरी पळ काढून जीव वाचवत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला येऊन घडलेल्या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे.
ही माहिती कळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये यांनी घटनेची दखल घेत तातडीने वरसाडे येथे पोलिस हेडकॉन्स्टेबल मा.श्री. रणजीत पाटील,मा.श्री. संदीप राजपूत व इतर सहकाऱ्यांना वरसाडे गावात पाठवून गावातील परिस्थिती जाणून घेत शांतता प्रस्थापित केली आहे.
बातमी लिहून होईपर्यंत सरपंच सौ.लिलाबाई राठोड, शिवदास राठोड व इतर हल्लेखोरांचे विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.
रामकृष्ण राठोड यांनी सोशल मीडियावर टाकलेला संदेश खालील प्रमाणे असून यात सत्ताधारी सरपंचांना राग येण्यासारखा कोणताही मजकूर नाही.
ग्रामपंचायत वरसाडे प्र पा येथे चालु वर्षात ३०,३७,५६७ ( तीस लाख , सदोतीस हजार , पाचशे सदुसष्ट ) रुपयाची कामे मंजूर झाली आहे. म्हणजे हा निधी जिल्हा परिषद , वित्त आयोग,असा सगळा सगळा मिळुन असेलं अस समजुया.. ( हा आकडा मी अंदाजे देत नाहीये तर भारत सरकारच्या Ministry of panchayt raj च्या अधिकृत वेबसाईटवरील ही माहिती आहे )
एप्रिल पासुन आत्तापर्यंत अंदाजे १० लाखाची काम झाली असतील असही आपण समजुन घेऊया…
तर वित्त आयोगाचा पैसा जसा वापरायचा तसा वापरा.आता फक्त एक काम करा.
आपलं गाव जरासं चमकु द्या. फक्त दिवाळी आल्यावरचं शुभमुहूर्तावर गावातल्या वीज खाबांवर १० रुपयाचे लाईट बसवु नका. आता आपलं गाव बारा महिने चमकु द्या. उच्चतम कंपनीचे लाईट लावा. आणि लाईट आत्ताही लावु शकतात. त्यासाठी दोन महिने वाट बघायची गरज नाही. गावातील दोन्ही तीन्ही तांड्यातील हायलॅम्प लाईट बंद पडलेली आहे. ती दुरुस्त करा.
करा ना खर्च… मिळतो आहे ना पैसा… आणि हो…
आता आपल्या गावात तरी कोरोनाचं सकंट नाहीये. आँक्टोबर महिन्यात ग्रामसभा घ्या..
येणारा पैसा कसा खर्च करणार.
काय काय नियोजन केले आहे.
कोणकोणती काम करायची ठरवली आहे. कामाचा काही प्राधान्यक्रम आहे ? हे लोकांनाही सांगा…
महत्वाच म्हणजे…
लोकांनी आता तरी प्रश्न विचारायला शिका. हा गोष्टी जाणुन घेत चला